रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांकडून सातत्याने नवनवे प्लान लाँच केले जात आहेत. आता व्होडाफोनने आपल्या युजर्ससाठी एक नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे.

रिलायंस जिओच्या 52 रुपयांच्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने 59 रुपयांचा ‘लहान सॅशे’ प्लान आणला आहे.59 रुपयांच्या या प्लानची वैधता सात दिवसांसाठी असेल. यात ग्राहकांना केवळ इंटरनेट डेटाचा लाभ मिळेल. यामध्ये दररोज एक जीबी डेटा मोफत म्हणजेच सात जीबी डेटा मिळेल.

दुसरीकडे, जिओचा 52 रुपयांचा पॅक देखील सात दिवसांच्या वैधतेचा आहे. पण, यात व्होडाफोनपेक्षा अधिक डेटा म्हणजे दररोज 1.05 जीबी डेटा मिळतो. याशिवाय, 70 एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनदेखील मोफत मिळत आहे. टेलिकॉम कंपन्यांचे ‘लहान सॅशे’ पॅक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत, परिणामी कंपन्या अशाप्रकारचे छोटे आणि स्वस्त प्लॅन लाँच करण्यावर भर देत आहेत.