News Flash

२९९ च्या प्लॅनमध्ये २४०० रुपयांचा फायदा , व्होडाफोनचा दावा

व्होडाफोनचा नवा प्लॅन सादर

२९९ च्या प्लॅनमध्ये २४०० रुपयांचा फायदा , व्होडाफोनचा दावा
(संग्रहित छायाचित्र)

टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या रेड पोस्टेपड प्लॅनच्या मालिकेतील नवा २९९ रुपयांचा बेसिक प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेड पोस्टपेड प्लॅनमध्ये काही फेरबदल केले होते. रेड पोस्टपेड प्लॅन वापरणाऱ्या अधिकांश ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि नेटफ्लीक्सचं सबस्क्रिप्शन मोफत मिळतं. रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉल्स देखील करता येतात. नव्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २० जीबी ३जी/४जी डेटा मिळेल. याशिवाय अमर्यादित फोन कॉल्स आणि अन्य अनेक सेवा मिळणार आहेत.

२९९ रुपयांचा प्लॅन हा व्होडाफोनच्या रेड पोस्टेपड प्लॅनच्या मालिकेतील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. अमर्यादित फोन कॉल्सशिवाय मोफत रोमिंग आणि दरदिवशी १०० एसएमएस पाठवता येतील. या प्लॅनमध्ये ५० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर करण्याचाही पर्याय आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये १२ महिन्यांसाठी व्होडाफोन प्ले चं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. २९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना २४०० रुपयांचा फायदा मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. पण हा प्लॅन ग्राहकांना केवळ व्होडाफोनच्या अॅपद्वारेच निवडता येणार आहे, कारण कंपनीच्या संकेतस्थळावर हा प्लॅन देण्यात आलेला नाही.

३९९ रुपयांपासून २ हजार ९९९ रुपयांपर्यंतच्या व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये बिल गॅरंटी, मोबाइल शील्ड , रेड हॉट डील्स, अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आणि नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मोफत मिळतं, पण २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यापैकी नेमक्या कोणत्या सेवा मिळतील याबाबत अद्याप माहिती नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 3:17 pm

Web Title: vodafone rs 299 red basic postpaid plan offers 20gb data
Next Stories
1 पालकांनो, मुलांमधील नैराश्य दूर करण्यासाठी ‘हे’ करा
2 Vat pornima : जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्त्व
3 …तर तुम्हालाही लागलंय इंटरनेटचे व्यसन