एकीकडे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांना नॉन-जिओ कॉलिंगसाठी दणका देणारा निर्णय घेतला असताना व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एका नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅननुसार कंपनीकडून ग्राहकांना 150GB पर्यंत अतिरिक्त इंटरनेट डेटाचा लाभ घेता येणार आहे.

व्होडाफोन-आयडियाने 399 रुपयांच्या नव्या पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली आहे. यामध्ये कंपनी 150GB पर्यंत अतिरिक्त इंटरनेट डेटा ऑफर करत आहे. सहा महिन्यांपर्यंत या प्लॅनची वैधता असेल. सध्या या प्लॅनमध्ये 40GB डेटा Rollover ची मर्यादा आहे. Rollover म्हणजे सर्व डेटाचा वापर न केल्यास उरलेला डेटा पुढील महिन्याच्या डेटामध्ये समाविष्ट केला जातो. आता यात 150GB पर्यंत अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय व्होडाफोन प्ले, मोबाइल शील्ड आणि जी5 सब्सक्रिप्शन या प्लॅनमध्ये मोफत आहे. या प्लॅनद्वारे युजर्सना एकूण 2 हजार 497 रुपयांचा फायदा मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा- Amazon-Flipkart चा दिवाळी सेल, ‘या’ लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ‘बंपर’ डिस्काउंट

टेलिकॉम कंपन्या सध्या पोस्टपेड ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणत आहेत. प्रीपेड ग्राहक पोस्टपेडकडे वळू नयेत हा यामागील उद्देश्य आहे. जिओच्या आगमनानंतर दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्रीपेड प्लॅन स्वस्त केलेत. यामुळे अनेक ग्राहक अतिरिक्त फायद्यासाठी प्रीपेडकडे वळत आहेत. कारण प्रीपेडमधील तीन महिने वैधता असलेले प्लॅन अधिक लोकप्रिय होतायेत. परिणामी कंपन्या आपल्या ‘प्रामाणिक’ पोस्टपेड ग्राहकांना निराश करु इच्छित नाहीत.