26 November 2020

News Flash

व्होडाफोनची दमदार ऑफर, १९९ रुपयांत दररोज २.८ GB डेटा

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर

(संग्रहित छायाचित्र)

रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं आपल्या १९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केला आहे. कंपनीकडून या प्लानमध्ये पहिलेच्या तुलनेत आता जवळपास दुप्पट डेटा मिळणार आहे.

याआधी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.४ जीबी २जी/३जी/ ४जी डेटा मिळायचा. पण आता यूजर्सना दररोज २.८ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच २८ दिवसांसाठी ७८.४ जीबी डेटा मिळणार आहे. याचाच अर्थ १९९ रुपयांच्या अपग्रेडेड प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत २.५३ रुपये होते. मात्र, हा प्रीपेड प्लॅन केवळ निवडक व्होडाफोन सब्सक्राइबर्ससाठीच उपलब्ध आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे युजर्सही या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

या प्लॅनअंतर्गत युजरला दररोज २.८ जीबी डेटा , अमर्यादित व्हॉइस कॉल्स सुविधा मिळेल. अमर्यादित कॉल्ससाठी २५० मिनिट दररोज व १००० मिनिट दर आठवड्याला अशी मर्यादा असेल. पण एसएमएसची सुविधा या प्लॅनअंतर्गत मिळणार नाही. यापूर्वीच्या १.४ जीबीच्या प्लॅनमध्ये १०० एसएमएस युजरला दररोज वापरासाठी मिळत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 1:12 am

Web Title: vodafone updates rs 199 prepaid plan
Next Stories
1 मिरचीपासून तयार केलेले औषध लठ्ठपणाविरोधात उपयुक्त
2 बीएमडब्ल्यू G 310 R आणि G 310 GS या बाईक भारतात लाँच
3 ..म्हणून वर्तमानपत्रात बांधलेली भजी आरोग्यासाठी धोकादायक
Just Now!
X