स्कोडा आणि फोक्सवॅगन ग्रुप इंडियाने पुणे, भारत येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्याला झेकचे पंतप्रधान आंद्रेज बाबीस आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. फोक्सवॅगन समूहाच्या वतीने स्कोडा इंडिया २.० प्रकल्प चालवत आहे. त्यातून फॉक्सवॅगन समूहाच्या भारतीय बाजारपेठेतील मॉडेल कॅम्पेनला सुरूवात करण्यात आली आहे. नवीन टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये २५० अभियंते उपखंडातील ग्राहकांच्या गरजांनुरूप तयार करण्यात आलेली वाहने विकसित करतील. इंडिया २.० प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या उत्पादनांचे सुमारे ९५ टक्के स्थानिकीकरण केले जाईल.

अंड्रेज बाबीस, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारमधील इतर सदस्य पुण्यात उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिले. या शिष्टमंडळाचे स्वागत ख्रिश्चन स्ट्रुब- स्कोडाच्या तांत्रिक विकास मंडळाचे सदस्य आणि स्कोडा ऑटोच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच फोक्सवॅगन ग्रुप, इंडियाचे प्रमुख गुरप्रताप बोपराय यांनी केले.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात

अंड्रेज बाबीस, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान, या वेळी उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, ”स्कोडा ऑटो ही कंपनी आपले अस्तित्व आणि सहभाग भारतात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व महत्त्वाच्या प्रकल्पांद्वारे विस्तारित करत आहे. स्कोडा भारतात जास्त क्षमतांसाठी उत्तम संधी निर्माण करत आहे आणि त्यामुळे ब्रँडचे धोरण दीर्घकालीन राहिले आहे.”

ख्रिश्चन स्ट्रुब- स्कोडाच्या तांत्रिक विकास मंडळाचे सदस्य म्हणाले की, “टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन करून आम्ही इंडिया २.० प्रकल्प अत्यंत यशस्वी बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत आहोत. भारतात उत्तम दर्जाची विद्यापीठे आणि अत्यंत सक्षम कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे या अद्ययावत सुविधेमुळे आम्हाला खूप क्षमता समोर आणण्यात मदत होईल- त्या क्षमता विशेषतः डिझाइन आणि विकासासंदर्भात असतील. स्थानिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे.”

चाकण (पुणे) येथील तंत्रज्ञान केंद्र इंडिया २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पहिले मोठे पाऊल आहे. फोक्सवॅगन ग्रुप आणि स्कोडा ऑटो भारतात संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये सुमारे २००० कोटी रूपये (२५० दशलक्ष युरो) गुंतवणूक करत आहेत. भारतीय अभियंत्यांवर प्रकल्प व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फोटेनमेंट, बॉडी डिझाइन, इंटिरियर्स, चॅसिस आणि संपूर्ण वाहनाची जबाबदारी असेल.

फोक्सवॅगन ग्रुप, इंडियाचे प्रमुख गुरप्रताप बोपराय म्हणाले की, ”टेक्नॉलॉजी सेंटरकडून विशेषतः भारतीय बाजारपेठांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादनांचा विकास केला जाईल. आम्ही आमची स्कोडा तसेच फोक्सवॅगन ब्रँडसाठीची पहिली उत्पादने २०२०-२१पर्यंत विकसित करण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी आम्ही एमक्यूबी ए० इन प्लॅटफॉर्मवर मध्यम आकाराच्या एसयूव्हीपासून सुरूवात करत आहोत. त्यानंतर स्कोडाच्या नेतृत्वाखाली एक मॉडेल कॅम्पेनला सुरूवात होईल. मला विश्वास वाटतो की, आम्ही स्कोडाच्या सर्व ताकदींचा वापर संपूर्ण फोक्सवॅगन समूहाच्या फायद्यासाठी करू शकतो.”

सुमारे २५० अभियंते नवीन टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये काम करत असतील. स्थानिकीकरण करण्यात आलेल्या एमक्यूबी ए० प्लॅटफॉर्मसाठीचे ९५ टक्के वाहनांचे भाग स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातील. भारतात विकसित करण्यात आलेली वाहने सुरक्षितता, दर्जा आणि डिझाइन यांची मानके साध्य करतील, ज्याचे प्रतिनिधित्व फोक्सवॅगन समूहाकडून जगभरात केले जाते. त्याचवेळी, स्कोडा आणि फोक्सवॅगन हे दोन्ही आपल्या स्वतःच्या वैयक्तिक व्यक्तिरेखांसाठी मॉडेल्स प्रदर्शित करतील.

जुलै २०१८ मध्ये फोक्सवॅगन समूहाने इंडिया २.० प्रकल्पात ७९०० कोटी रूपयांची गुंतवणूक (१ बिलियन युरो) करण्याचे निश्चित केले. तिचा प्राधान्याने वापर भारतीय बाजारपेठांसाठी स्कोडा ऑटो आणि फोक्सवॅगन वाहनांचा विकास करण्यासाठी केला जाईल. या मॉडेल्समधील पहिले काही मॉडेल्स ए० वर्गातील मध्यम आकाराचे एसयूव्ही असेल आणि त्याचे उद्घाटन २०२० मध्ये केले जाईल.