News Flash

Fortuner ला टक्कर द्यायला आली Volkswagen ची ‘ढासू’ SUV, जाणून घ्या डिटेल्स

फोक्सवॅगनच्या एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या या SUV मध्ये मोठा व्हीलबेस...

Volkswagen India ने काही दिवसांपूर्वी भारतात आपली नवीन Tiguan Allspace एसयूव्ही लाँच केली. फोक्सवॅगनच्या एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या टिगुआन ऑलस्पेसमध्ये एक मोठा व्हीलबेस आहे. त्यामुळे जास्त जागा, लवचीकता आणि सामानाची जागा तयार होते. प्रीमियम सात सीटर टिगुआन ऑलस्पेस 2.0 आयटीएसआय इंजिनसोबत बनवलेली असून ती 7 स्पीड डीएसजी 4 मोशन ट्रान्समिशनशी जोडलेली आहे. नवीन Tiguan Allspace भारतात सध्या असलेल्या रेग्युलर टिगुआन कारचे 7 सीटर व्हर्जन आहे. नवीन BS6 Tiguan Allspace जुन्या 5 सीटर मॉडेलच्या तुलनेत 215mm जास्त लांब आहे. बाहेरील बाजूने काही छोटे बदल करण्यात आले आहेत. डॅशबोर्ड आणि नियंत्रण यांची रचना डिजिटल कॉकपिटने तसेच इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या स्क्रीनद्वारे केलेली आहे. सुरक्षेला खूप महत्त्व दिले असून सात एअरबॅग्स, एबीएस, ईएसपी, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि इतर अनेक गोष्टी आहेत.

कारमध्ये नवीन LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, रिडिझाइंड ग्रिल, जास्त स्पोर्टी बंपर आणि मोठे 18 इंच स्पोक अ‍ॅलॉय व्हिल्स आहेत. “Tiguan Allspace ही जागतिक स्तरावर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या आमच्या चार कारपैकी एक कार आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही गाडी लाँच करताना आम्हाला आनंद होतोय”, असं कंपनीने लाँचिंगवेळी सांगितलं. नवीन ‘टिगुआन ऑलस्पेस’मध्ये 110mm अतिरिक्त व्हिलबेस असून कारची रुंदी 1839mm म्हणजे आधीइतकीच आहे. उंचीमध्ये बदल करण्यात आला आहे. कारची उंची 2mm ने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 1674mm इतकी या कारची उंची झाली आहे. ही कार सात कलर स्कीम्समध्ये उपलब्ध करण्यात आलीये, यामध्ये ऑरेंज, पेट्रोलियम ब्लू, प्युअर व्हाइट, पायरिट सिल्व्हर, रूबी रेड, डीप ब्लॅक पर्ल आणि प्लेटिनम ग्रे कलर्सचा समावेश असेल.

BS6 स्टँडर्ड पेट्रोल इंजिन –
कंपनीने ही कार BS6 पेट्रोल इंजिनसह आणली असून हे इंजिन 2.0 लीटर फोर-सिलिंडर TSi टर्बो पेट्रोल इंजिन 187bhp पावर आणि 320Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 7 स्पीड DSG (DCT) ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑलव्हील ड्राइव्ह सिस्टिमसोबत येते. भारतीय बाजारात होंडा सीआर-व्ही , टोयोटा फॉर्च्यूनर, फोर्ड एंडेवर आणि महिंद्रा अल्टूरस G4 यांसारख्या गाड्यांशी Tiguan Allspace ची थेट स्पर्धा असेल.

किंमत –
या गाडीची एक्स शोरूम किंमत 33.13 लाख रुपये असून ही ‘बीएस- ६’ मानांकन असलेली असून या गाडीत भारतीय एसयूव्ही कार खरेदीदारांच्या आशा-आकांक्षांना स्थान दिल्याचा कंपनीचा दावा आहे. 33.13 लाख रुपये इतकी या कारच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:31 pm

Web Title: volkswagen launches tiguan allspace premium 7 seat version in india at rs 33 12 lakh know specifications and all other details sas 89
Next Stories
1 Jio ची ‘या’ स्मार्टफोन युजर्ससाठी भन्नाट ऑफर, मिळेल दुप्पट डेटासह एक वर्षाची फ्री सर्व्हिसही
2 किंमत 10 हजारांपेक्षाही कमी, सर्वात स्वस्त ‘पॉप अप सेल्फी’ कॅमेऱ्याच्या स्मार्टफोनचा सेल
3 14 वर्षांचा प्रवास संपला? Hero च्या लोकप्रिय Scooty चं प्रोडक्शन बंद
Just Now!
X