Volkswagen India ने भारतात आपली नवीन Tiguan Allspace एसयूव्ही लाँच केली आहे. नवीन Tiguan Allspace भारतात सध्या असलेल्या रेग्युलर टिगुआन कारचे 7 सीटर व्हर्जन आहे. नवीन BS6 Tiguan Allspace जुन्या 5 सीटर मॉडेलच्या तुलनेत 215mm जास्त लांब आहे. बाहेरील बाजूने काही छोटे बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये नवीन LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, रिडिझाइंड ग्रिल, जास्त स्पोर्टी बंपर आणि मोठे 18 इंच स्पोक अ‍ॅलॉय व्हिल्स आहेत. “Tiguan Allspace ही जागतिक स्तरावर सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या आमच्या चार कारपैकी एक कार आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही गाडी लाँच करताना आम्हाला आनंद होतोय”, असं कंपनीने लाँचिंगवेळी सांगितलं.

(आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच, Fortuner ला टक्कर)

नवीन ‘टिगुआन ऑलस्पेस’मध्ये 110mm अतिरिक्त व्हिलबेस असून कारची रुंदी 1839mm म्हणजे आधीइतकीच आहे. उंचीमध्ये बदल करण्यात आला आहे. कारची उंची 2mm ने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता 1674mm इतकी या कारची उंची झाली आहे. ही कार सात कलर स्कीम्समध्ये उपलब्ध करण्यात आलीये, यामध्ये ऑरेंज, पेट्रोलियम ब्लू, प्युअर व्हाइट, पायरिट सिल्व्हर, रूबी रेड, डीप ब्लॅक पर्ल आणि प्लेटिनम ग्रे कलर्सचा समावेश असेल.

(आणखी वाचा – लाँचिंगआधीच बुकिंगला सुरूवात, ‘सेल्टॉस’ला Hyundai च्या ‘एसयूव्ही’ची टक्कर)

BS6 स्टँडर्ड पेट्रोल इंजिन –
कंपनीने ही कार BS6 पेट्रोल इंजिनसह आणली असून हे इंजिन 2.0 लीटर फोर-सिलिंडर TSi टर्बो पेट्रोल इंजिन 187bhp पावर आणि 320Nm टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत 7 स्पीड DSG (DCT) ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑलव्हील ड्राइव्ह सिस्टिमसोबत येते. भारतीय बाजारात होंडा सीआर-व्ही , टोयोटा फॉर्च्यूनर, फोर्ड एंडेवर आणि महिंद्रा अल्टूरस G4 यांसारख्या गाड्यांशी Tiguan Allspace ची थेट स्पर्धा असेल.

(आणखी वाचा – ‘मारुती’च्या SUV चा जलवा, फक्त 20 दिवसांत बुकिंग 10 हजारांपार)

किंमत –
33.13 लाख रुपये इतकी या कारच्या बेसिक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे.

(आणखी वाचा – ‘मारुती’च्या SUV चा जलवा, फक्त 20 दिवसांत बुकिंग 10 हजारांपार)