टीव्हीवर सिनेमा पाहण्याचा अनुभव  मिळावा यासाठी भारतीय कंपनी Vu ने नवीन Cinema TV सीरीज लॉच केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने तीन मॉडेल्स लाँच केले आहेत. या सीरिजमधील टीव्ही मॉडेल्समध्ये ‘पिक्सेलियम ग्लास टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे.

फीचर आणि स्पेसिफिकेशन्स:
या टीव्ही मालिकेतील सर्व मॉडेल्स 4K रिझोल्युशनला सपोर्ट करतात. दर्जेदार व्हिजुअल्ससाठी टीव्हीमध्ये ‘पिक्सेलियम ग्लास टेक्नॉलॉजी’ आणि दमदार आवाजासाठी 40W बिल्ट इन साउंडबार आणि डॉल्बी प्रोसेसर ऑडिओ आहे.

OTT सर्व्हिस सपोर्ट:
हा स्मार्ट TV अँड्रॉइड 9.0 पायवर कार्यरत असेल. सर्व प्रमुख OTT सेवांचा सपोर्ट टीव्हीला आहे. या टीव्हीमध्ये स्लीक फ्रेमलेस डिझाइन दिली आहे. टीव्हीसोबत ‘बिल्ट इन माइक्रोफोन’ आणि ‘पाच हॉट की’ असलेले ActiVoice रिमोट मिळते.

घरबसल्या थिएटरचा अनुभव:
“भारतात Vu टेक्नॉलॉजी टीव्हीशी निगडीत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इनोव्हेशनमध्ये 2006 पासून लीडर आहे. आम्ही Vu सिनेमा टीव्ही लाँच करुन आमचं वचन निभावलंय. हा टीव्ही ग्राहकांच्या वॉचिंग पॅटर्ननुसार बनवण्यात आला आहे. थिएटर तिकीटाचे पैसे वाचवून घरबसल्या थिएटरचा अनुभव ग्राहक घेऊ शकतात”, असा दावा कंपनीच्या CEO देविता सराफ यांनी दिलीये.

आणखी वाचा – Honor आणणार लॅपटॉप आणि पॉप-अप कॅमेऱ्याचा Smart TV

किंमत:
कंपनीने स्क्रीन साइजच्या आधारे तीन मॉडेल्स लाँच केले आहेत. 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजसह हे तीन मॉडेल्स बाजारात उतरवण्यात आलेत. यांची अनुक्रमे किंमत 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून या टीव्हींची विक्री अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर सुरू होईल.