पीटीआय, वॉशिंग्टन

कार्यालयीन काम झाल्यावर तुम्ही जर तुमच्या कामाच्या इ-मेलची वाट पहात असाल ते हानीकारक आहे. काम संपल्यावर त्यात गुंतून राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही असे एका अभ्यासांती स्पष्ट झाले आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक जीवनात घरून काम हा नेहमीचा भाग असला तरी, अशी इ मेलची वाट पाहण्यामुळे चिंता वाढून संबंधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो असे अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक येथील सहयोगी प्राध्यापक विल्यम बेकर यांनी सांगितले. यापूर्वीच्या अभ्यासानुसार नोकऱ्यांतील वाढती गरज पाहता अशा कामाचा दबाव असतो. मात्र त्यातून कौटुंबिक कलह वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. आता नव्या अभ्यासानुसार कामानंतर कर्मचाऱ्याला त्यासाठी वाट पहावी लागणे हानीकारक आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळांबरोबर अन्य वेळीही त्यांच्यावर कामाचा दबाव राहतो. या वाढत्या अपेक्षांमुळे स्वाभाविकच दडपण येते. तुम्हाला कामाच्या वेळेचे स्वातंत्र्य दिले आहे असे सांगितले जात असले तरी त्यात प्रत्यक्षात कामाचे तास वाढतात असे आमच्या संशोधनात सिद्ध झाले आहे असे बेकर यांनी स्पष्ट केले. त्यात कर्मचारी जरी घरी असला किंवा काही काही काम करत नसला, कार्यालयीन काम येईल या अपेक्षेत त्याच्यावर एक प्रकारे जबाबदारीचे ओझे राहते असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. या वाढत्या अपेक्षांचा त्रास त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना होतो असे बेकर यांनी सांगितले.