News Flash

वेक अप टू मेक-अप

वेगवेगळ्या आॅकेजनसाठी वेगवेगळे लूक्स कसे करायचे

नेहमीच ठेवा 'डिफरंट लूक'

चारचौघांत आपण उठून दिसावं यासाठी चांगला पेहराव, चांगल्या दागिन्यांइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे मेकअप. अर्थात वेळेनुसार, वेगवेगळ्या प्रसंगांनुसार तो वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असतो.

मेकअप करणे हा आता दररोजच्या जीवनातील एक भाग झाला आहे. फॉर्मल मीटिंग्स, इन्फॉर्मल मीटअप्स, डे आउट्स, नाइट पार्टीज या सगळ्यासाठी दरवेळी तोच तोच मेकअप चांगला दिसत नाही. मेकअप करण्याच्या पद्धती किंवा वापरण्यात येणाऱ्या रंगांमध्ये कमी-जास्त फरक करावे लागतात. वेळेनुसार आणि निमित्तांनुसार मेकअप कसा असावा, त्यात काय बदल करावेत याबद्दल

प्रत्येक आॅकेजनला वेगळा मेकअप करावा प्रत्येक आॅकेजनला वेगळा मेकअप करावा

 

सुरुवातीला मेकअप करणे केवळ गुलाबी रंगांच्या छटांपर्यंतच मर्यादित होतं. परंतु आता वेगवगेळ्या वेळेनुसार आणि निमित्तांनुसार वेगवगेळ्या रंगछटा मेकअपमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. नॅचरल शेड्स, ग्लॉसी, मॅट, ब्राउन, ब्राइट, पास्टल अशा विविध पॅलेटमधल्या शेड्स हल्ली वापरल्या जातात. चेहऱ्यावर लावण्यात येणारा बेससुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. मॉइश्चराइझर, फाउंडेशन किंवा सी सी क्रीम
(कॉम्प्लेक्शन केअर क्रीम), कन्सीलर, कॉम्पॅक पावडर इत्यादीच्या साहाय्याने सुंदर मेकअप बेस लावला जातो. याच्या बरोबरीने मेकअप ब्रशेससुद्धा महत्त्वाचे असतात. अचूक ब्रश वापरून केलेला मेकअप अत्यंत व्यवस्थित लागतो. बोटांचा वापर करूनही मेकअप करता येतो.

ब्रशेसचा वापर

बेसिक मेकअप ब्रशमध्ये पावडर ब्रश, आयशॅडो ब्रश, आयशॅडो ब्लेंडर, ब्रॉव कोम्ब, लिप ब्रश हे ब्रश असतात. आता ब्युटी ब्लेंडर उपलब्ध झालेलं आहे. प्रत्येक ब्रश हा वेगवेगळ्या हेतूंसाठी असल्याने त्याचे ठरावीक आकार असतात. आणि त्यानुसारच ते वापरावेत. ब्युटी ब्लेंडर म्हणजे स्पंजची विशिष्ट आकाराची वस्तू ज्याच्यामुळे बेस उत्तम लागतो. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतेही पॅचेस दिसत नाहीत. ब्रशेस नसतील तर बोटांच्या साहाय्यानेही उत्तम मेकअप करता येतो. परंतु ब्रशेसची मदत घेणे सोयीस्कर ठरते.

उठावदार कॉन्टोरिंग 

मेकअपमध्ये कॉन्टोरिंग ही पद्धत सध्या खूप इन आहे. कॉन्टोरिंग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील विशिष्ट भाग हायलाइट करणे. त्यामुळे केलेला मेकअप उठावदार दिसतो. डोळे, नाक, कपाळाची कड, चीक बोन्सच्या खालील लाइन हे सगळं कॉन्टोर केलं जातं. डोळे, नाक, चीकबोन्स, कपाळ त्यामुळे उठून दिसतात. कोणत्याही प्रकारच्या मेकअपसाठी कॉन्टोरिंग उपयोगी ठरतं. कॉन्टोरिंग करताना आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड डार्क रंगाच्या कलर पॅलेट वापरून उठावदार केले जाते.

बेस 
मेकअप बेस लावताना सुरुवातीला चेहऱ्याला मॉइश्चरायझर किंवा प्राइमर लावून घ्यावं. त्यांनतर त्यावर सीसी क्रीम किंवा फाउंडेशनचा कोट लावावा. त्यावर कन्सीलर वापरून डोळे, नाक हा भाग हायलाइट केला जातो. त्याचबरोबर ब्लॅक सर्कल्स, चेहेऱ्यावरील पिंपल्स, काही लहान-मोठे डाग झाकण्यासाठीही कन्सीलर वापरतात. या सगळ्याला व्यवस्थित पसरवून बेस तयार होतो. ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने उत्तम बेस तयार करण्यास मदत होते. बोटांच्या साहाय्यानेही बेस तयार करू शकता.

बेसिक मेकअप लूक्स :

ऑफिस लूक  

ऑफिससाठी मेकअप करताना नॅचरल शेड्स वापराव्यात. त्यात आपल्या स्किन टोनला मॅच होणाराच मेकअप करावा. लिप कलर्स उठावदार वापरले तरी हरकत नाही. शक्यतो पर्पल, लाल, तपकिरी अशा रंगाच्या फिक्या शेड्स वापराव्यात, ऑफिस लुकसाठी न्यूड लिपस्टिक शेड्ससुद्धा अत्यंत सटल वाटतात. ब्लश लावतानाही हलकी गुलाबी रंगाची शेड किंवा आपल्या स्किन टोनला शोभून दिसणारी शेड वापरावी. आय श्ॉडोज वापरताना ब्राउन शेड्स वापराव्यात. डोळे उठावदार दिसणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे काजळ, आयलाइनर, मस्कारा नक्कीच वापरावं. आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी-जास्त ठेवावं. फ्रेश मेकअप करण्यावर भर द्यावा. परंतु अति पावडर किंवा भरपूर जाड बेस टाळा.

डे आउट लूक :

दिवसा बाहेर जाताना फ्रेश रंगछटा वापराव्यात. काही प्रमाणात गुलाबी रंगछटा वापरू शकता. आपल्या आउटफिटला साजेशा फ्रेश आयशॅडोज् वापराव्या. आउटफिटप्रमाणे पास्टल शेड्स वापराव्यात. त्यामध्ये निळा, हिरवा, गुलाबी या रंगांच्या पेस्टल शेड्सचा वापर करा. ब्लश वापरताना गुलाबी रंगाच्या शेड्स दिवसा वापरण्यास हरकत नाही. लिपस्टिक्स वापरतानासुद्धा फ्रेश लाल, गुलाबी शेड्स वापरा. आय मेकअप हलका असला तरीही चालेल. काजळ किंवा आयलायनर यांचा एक-एक स्ट्रोकसुद्धा पुरेसा ठरेल. आवडीप्रमाणे ते कमी-जास्त करू शकता.

नाइट लूक :

रात्रीच्या वेळी बाहेर जाताना ग्लॉसी मेकअप करू शकता. परंतु त्याचं प्रमाण योग्य असावं. त्यासाठी ग्लॉसी मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करावा. शिमरी आय शॅडोज् नाइट लुकसाठी नक्कीच वापरू शकता. गोल्डन आणि सिल्व्हर शेड्स वापरून बघा. रात्रीच्या वेळेस ग्लॉसी पिंक ब्रश वापरू शकता. लिप कलर्स वापरताना रेड, मर्साला, पर्पल रंगांच्या शेड्स असे रंग उठावदार दिसतात. स्मोकी आइज रात्रीच्या वेळी खूप खुलून दिसतात. आय लायनर, काजळ यांचा आवडीप्रमाणे वापर करा. परंतु रात्रीच्या वेळी डोळे उठावदार दिसतील याची काळजी घेणं आवश्यक आहे.

नो मेकअप लूक :

मेकअप केलाच नाही असं वाटावं परंतु चेहऱ्याला उठाव यावा यासाठी हा मेकअप लुक वापरला जातो. यामध्ये जास्त मेकअप प्रॉडक्ट्स वापरले जात नाहीत. अत्यंत बेसिक प्रॉडक्ट्स वापरून हा लुक तयार होतो. यामध्ये आपल्या स्किन टोनशी एकरूप होणारा बेस तयार करावा. अगदी कमी सीसी क्रीम किंवा फाउंडेशन वापरावं. त्यावर फाउंडेशन पावडर लावून बेस पूर्ण करावा. नॅचरल आयश्ॉडो वापरावे. लिपस्टिक्ससुद्धा लिप कलरशी मिळतीजुळतीच वापरावी. बारीक काजळ, आयलायनर लावून लुक परिपूर्ण करावा.

काही टिप्स :

  • मेकअप करताना आपल्या स्किन टोनचा आणि आपण वापरात असलेल्या प्रॉडक्ट्सचा ताळमेळ असणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मेकअप पांढरा किंवा खूप डल दिसेल. आणि संपूर्ण लुक खराब होईल.
  • प्रत्येक वेळेप्रमाणे आणि ऑकेजननुसार मेकअप बदलतो ही बाब लक्षात ठेवावी.
  • केवळ गुलाबी रंग वापरणं म्हणजे मेकअप करणं हा गैरसमज आहे. त्यामुळे आपल्या आउटफिटला साजेसे रंग आपल्या मेकअपमध्ये वापरावे.
  •  चष्मा वापरत असाल तर काजळ आणि आयलायनर वापरून डोळे हायलाइट करायला विसरू नका.
  • बेस लावताना चेहऱ्यावर पॅचेस येत नाहीत ना याची काळजी घ्या.
  • गरज असेल तरच कन्सीलर वापरावे.
  • काजळ, लायनर मस्कारा अशा गोष्टी लावताना चेहऱ्यावर चुकून डाग पडला तर पाण्याचा वापर करून तो काढण्यापेक्षा हळू हाताने टिपावा त्यावर फाउंडेशन किंवा कन्सीलर वापरून तो झाकावा.
  • केलेला मेकअप रोज काढून टाकावा.
  • मेकअप काढताना कापसावर क्लिंझिंग मिल्क घेऊन मेकअप काढावा नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.
  • रोज मेकअप करत असाल तर रात्री झोपताना चेहऱ्याला बॉडी लोशन किंवा मॉइस्चराइझर लावावे.

सौजन्य: लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 10:35 am

Web Title: wake up to make up
Next Stories
1 ओठांवर लिप बाम लावताना ‘या’ गोष्टी जरूर पाळा
2 गरिबीमुळे आयुर्मानात २.१ वर्षांनी घट
3 सोन्याची थाळी कशाला? ‘आयपॅड’ च्या थाळीवर जेवा की
Just Now!
X