News Flash

चालल्याने शरीरातील दाह कमी होण्यास मदत

नियमित शारीरिक व्यायाम करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

| January 16, 2017 01:33 am

दररोज केवळ २० मिनिटे चालण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीरातील दाह कमी होण्यास मदत होत असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे. चालण्यामुळे संधिवात आणि लठ्ठपणा या आजारावर मात करण्यात येते, असे यामध्ये म्हटले आहे.

नियमित शारीरिक व्यायाम करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. वजन नियंत्रित करणे, हृदय मजबूत होण्यासह हाडे आणि स्नायूंचे आजार दूर होण्यास मदत होत असते.

अमेरिकास्थित कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या नवीन अभ्यासानुसार, मध्यम स्वरूपाचा व्यायाम केल्यामुळे शरीरातील दाह कमी होत असल्याचे आढळून आले. २० मिनिटांचा साधारण चालण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच दाह कमी होत असल्याचे नव्या अभ्यासात आढळून आले.

प्रत्येक वेळी आपण व्यायाम करतो त्या वेळी शरीरातील अनेक पातळय़ांवर आपण काही तरी चांगले करीत असतो. व्यायामामुळे प्रतिकारशक्तीही वाढत असल्याचे अमेरिकेतील डियेगो स्कूल ऑफ मेडिसिनचे सुझी हाँग यांनी म्हटले आहे.

मेंदू आणि मज्जासंस्था हे हृदयगती आणि रक्तदाब नियंत्रित करीत असतात. व्यायाम करण्यामुळे मेंदू आणि मज्जासंस्था यांना चालना मिळत असते. एपिनेफ्रिन आणि नोरेपिनेफ्रिन संप्रेरक शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करीत असतात. २० मिनिटे व्यायाम केल्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असल्याचे अभ्यासात दिसून आले. हे संशोधन मेंदू, वर्तणूक आणि रोगप्रतिकारकशक्ती या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:33 am

Web Title: walking is good for health 2
Next Stories
1 स्किझोफ्रेनियामुळे मधुमेहाच्या धोक्यात वाढ
2 पाठदुखीच्या आजारावर योगासने उत्तम उपाय
3 Makar sankrant: जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व
Just Now!
X