26 September 2020

News Flash

लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर छोट्या उद्योजकांचा भर

करोना व्हायरसशी लढा देत असतानाच पुन्हा काम सुरू करत असलेल्या छोटया व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

करोना व्हायरसशी लढा देत असतानाच पुन्हा काम सुरू करत असलेल्या छोटया व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अशा छोट्या व्यावसायिकांसाठी ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टची ‘वॉलमार्ट वृद्धी सप्लायर डेव्हलपमेंट’ ही सेवा फायदेशीर ठरत आहे. करोना संक्रमणादरम्यान जीवनावश्यक वस्तू, पीपीई किट्स, हँडवॉश, फेस मास्कचे उत्पादन व पुरवठा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. वॉलमार्टचे पुरवठादार असणाऱ्या बबिता गुप्ता आणि राहुल बजाज यांनी या व्यवसायात बाजी मारत छोट्या उद्योजकांना एक वस्तुपाठच घालून दिला आहे. फेस मास्क व हँडवॉश स्टेशन यांच्या निर्मितीत त्यांनी यश प्राप्त केले आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये सुरू केलेल्या ‘वॉलमार्ट वृद्धी’ पुरवठादार विकास कार्यक्रमाअंतर्गत, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी ५० हजार भारतीय एमएसएमईंना ‘मेक इन इंडिया’करण्यासाठी सक्षम बनवण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.  २००७ पासून सारवी क्रिएशन्सच्या संस्थापक बबीता गुप्ता घरगुती फर्निचर, फॅब्रिक आणि कापडी वस्तूंचा पुरवठा करत होत्या, मात्र कोविडच्या धक्क्याने त्यांचा व्यवसाय धोक्यात आला. मागणी कमी होताच बबिताने व्यवसाय चालू ठेवण्यासाठी मार्ग शोधण्यास सुरुवात केली. फेस मास्कची वाढती मागणी ओळखून, तिने स्वस्त दरात कापडी मास्क पुरवण्यासाठी हरियाणाच्या सोनपत येथील आपल्या फॅक्टरीत उत्पादन सुरू केले. नुकतीच बबिताने वॉलमार्ट बेस्ट प्राइसवरुन ८० हजार मास्कची पहिली ऑर्डर मिळवली आहे. त्या पीपीई उत्पादनावरही काम करत आहेत आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) कडून मान्यता मिळाल्यानंतर ते पॅरामेडिकल स्टाफ आणि रुग्णालयांना पुरवठा करण्यास सुरवात करतील. इटली आणि ब्रिटनसारख्या बाजारात लोकप्रिय असणारे सुती मास्क निर्यात करण्याचीही त्यांची योजना आहे, “कोविडमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र त्याचा धीराने मुकाबला करण्याच्या विचारांनी मला मास्क व पीपीईंचे उत्पादन सुरू करण्यास प्रवृत्त केले. मला वॉलमार्टच्या वृद्धी टीमकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी आर्थिक योजनांविषयी सरकारी सल्लामसलत आणि व्यावसायिक कामकाजाबद्दल मोलाचा सल्ला दिला. आमच्यासारख्या छोट्या व्यवसायासाठी वेबिनार त्यांनी आयोजित केले होते. यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले,” असे बबिता सांगतात.

दुसरीकडे, ‘श्री शक्ती एंटरप्रायजेस’चे संचालक राहुल बजाज यांचीही अशीच कोंडी झाली होती. सोनपतमध्ये त्यांचे चार उत्पादन प्रकल्प बंद पडले. १९५६ पासून श्रीशक्ती एंटरप्राइझ हा स्टीलच्या भांडी बनवण्याचा कौटुंबिक व्यवसाय आहे. राहुल यांनी कारखान्यांपैकी एका ठिकाणी पायांच्या पॅडलमधून हात धुण्यासाठी स्टेशन बनवायला सुरुवात केली. अवघ्या तीन दिवसांत तयार केलेल्या पहिल्या नमुन्याला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे प्रोत्साहित होऊन, राहुल यांनी आपले प्रोटोटाइप तांत्रिक व्यवहार्यता आणि व्यावसायिक व्यवहार्यतेबद्दल अभिप्रायासाठी वॉलमार्टकडे पाठवले. आज त्याला विविध उद्योग, सार्वजनिक आणि सरकारी संस्थांकडून हँड्सफ्री हँड वॉश स्टेशनसाठी ८५० ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि लॉकडाऊन सुरू असतानाही विक्रीत १.१५ कोटी रुपये मिळवण्यास मदत केली आहे. राहुल म्हणतात, “आमचा किचनवेअर व्यवसाय शून्यावर आला होता. आम्हाला व्यवसायात टिकून राहण्यास नवनिर्मितीचा विचार करणे गरजेचे होते. वॉलमार्टच्या सहकार्याने उत्पादनाची व्यवहार्यता आणि त्यावरील ऑफर समजून घेण्यास मदत मिळाली. कोविडसंबंधित सुरक्षा मार्गदर्शक सूचना आणि व्यवसायविषयक बाबींसाठी वालमार्ट वृध्दीकडून बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:17 pm

Web Title: walmart hand holds small indian firms reinventing themselves amid pandemic by walmart vriddhi supplier development programme sas 89
Next Stories
1 कोल्ड ड्रींकनंतर कोका कोला उतरलं डेअरी प्रोडक्टमध्ये
2 Samsung च्या ‘या’ फोनवर ₹5000 कॅशबॅकची ऑफर, मिळतील शानदार फीचर्स
3 Samsung Galaxy A21s भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Just Now!
X