25 February 2021

News Flash

नाटक-सिनेमा पाहा; नैराश्य पळवा!

इंग्लंडमधील लंडन महाविद्यालय विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नाटक-सिनेमाला नियमित जाण्याने किंवा वस्तुसंग्रहालयांना भेटी दिल्याने वृद्धावस्थेत नैराश्याचा विकार जडण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणावर कमी होते, असे एका अभ्यासात आढळले आहे.

इंग्लंडमधील लंडन महाविद्यालय विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. वयाची पन्नाशी ओलांडण्यावर निर्माण होणारा नैराश्याचा धोका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे व्यक्तीचे प्रमाण यांच्यात सुस्पष्ट संबंध असल्याचे त्यांना आढळून आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतल्याने नैराश्याला सामोरे जाणे, त्यातून बाहेर पडणे तर शक्य होतेच, शिवाय नैराश्यापासून दूर राहण्यासाठी हा अशा कार्यक्रमांचा फायदा होतो, असे या पाहणीत दिसून आले. या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

हा अभ्यास अहवाल ‘ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॅस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. जे लोक दर काही महिन्यांनी सिनेमा किंवा नाटकाला जातात किंवा प्रदर्शनांना भेटी देतात, त्यांच्यात नैराश्य निर्माण होण्याची शक्यता ३२ टक्क्यांनी कमी होते. ज्या व्यक्ती महिन्याला एकदा किंवा त्याहून अधिक वेळा अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेतात, त्यांच्यात तर हा धोका निम्मा म्हणजे ४८ टक्क्यांनी कमी होतो, असे आढळले आहे.

या शोध प्रबंधाचे वरिष्ठ लेखक डायसी फॅन्कोर्ट म्हणाले की, साधारणपणे लोकांना आहार, व्यायामाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी होणारे लाभ माहीत असतात. पण सांस्कृतिक उपक्रमांचेही असेच फायदे आहेत, याबाबत फारशी माहिती कोणाला नाही. पन्नाशी ओलांडलेल्या दोन हजारांहून अधिक व्यक्तींबाबत माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे सर्वजण ‘लाँग रनिंग इंग्लिश लॉन्जिटय़ुडिनल स्टडी ऑफ एजिंग’ या अभ्यास अभियानात सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 12:51 am

Web Title: watch movies when you are depressed
Next Stories
1 मोबाईल नंबर पोर्ट करणे झालं आणखी सोपं
2 मुदतपूर्व प्रसूतीच्या बाळांसाठी कॅफिन उपयुक्त
3 शुक्रवारी असा ठेवा तुमचा कॅज्युअल ऑफीस लुक
Just Now!
X