खूप जास्त पाणी पिण्याने मेंदूत जास्त अर्धद्रवपदार्थ साठून सूज येऊ शकते, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. त्यांच्या मते मेंदूत पाणी साठल्याने रक्तातील सोडियमची पातळी घातक पातळीवर कमी होते. त्यामुळे हायपोनॅट्रेमिया होतो. यात मेंदूला सूज येऊन वेदना होतात. मॅकगील युनिव्हर्सिटी सेंटरच्या चमूने म्हटले आहे की, कॅनडाने मेंदूतील परिणामांचे कोडे सोडवले असून अति पाणी पिण्याने मेंदूवर वाईट परिणाम होत असतो. ‘जर्नल सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून हायपोनॅट्रेमिया या अवस्थेत मेंदूची हानी होत असल्याचे त्यात म्हटले आहे. हायड्रोमिनरल व फ्लुईड इलेक्ट्रोलाइट होमिओस्टॅसिस या प्रक्रियांचा अभ्यास यात करण्यात आला, असे चार्लस बोर्क यांनी म्हटले आहे. वृद्ध लोकांमध्ये हा परिणाम दिसून येतो. त्यात नंतर काही प्रमाणात मेंदूतील भागांना छेद जाऊन बोधनात्मक समस्याही निर्माण होतात. यात मेंदूच्या जलसंवेदन प्रक्रियेत बिघाड झालेला असतो. जास्त पाणी सेवन केल्याने टीआरपीव्ही ४ हा पेशी द्वारपाल कार्यान्वित होतो. यात हा घटक ग्लायल पेशींच्या कॅल्शियम मार्गिकात असतो. जलसंवेदनाशी संबंधित न्यूरॉनभोवती त्याचे अस्तित्व असते. जलसंवेदनाचे काम बिघडल्याने मेंदूत जास्त अर्धद्रवपदार्थ साठत जाऊन हानी होते. टॉरिन या अमायनो अ‍ॅसिडचे काम बंद पडले की जलसंवेदन प्रणाली बंद पडते व त्यामुळे घातक परिणाम मेंदूत दिसून येतात.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स