News Flash

होळी स्पेशल : ‘हे’ आहेत पाण्यातही ओले न होणारे फोन

नवीन फोन घेणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय

नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर असा फोन घ्या जो पाण्यात पडला तरीही खराब होणार नाही. होळी आणि धुलिवंदन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले असताना त्यानिमित्ताने बाजारात विविध मोबाईल कंपन्यांनी आपली विशेष उत्पादने सादर केली आहेत. त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाण्यात पडले तरीही खराब होणार नाहीत असे मोबाईल फोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हा रंगांचा सण तुम्हाला आनंददायी करायचा असेल तर या फोनचा तुम्ही नक्कीच विचार करू शकतात. पाहूयात असे कोणते फोन आहेत जे पाण्यात पडल्यावरही खराब होणार नाहीत.

Apple iPhone X

या फोनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान अत्युच्च दर्जाचे असल्याने त्याची किंमत खूप जास्त आहे. या फोनचा आयपी ६७ असल्याने धूळ, पाणी यांपासून फोनचे संरक्षण होण्यास मदत होते. ५.८ इंचाची सुपर रेटीना असलेली स्क्रीन या फोनला देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे.

Samsung Galaxy S9

या फोनचा आयपी ६८ असून या फोनमध्ये अतिशय चांगली फिचर्स आहेत. मु्ख्य म्हणजे पाण्यापासून फोनचे संरक्षण करणारा हा फोन वापरण्यासही अतिशय सोपा आहे. याची किंमत अजून जाहीर झाली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Samsung Galaxy S9+

या फोनला ६.२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय या मोबाईलला तर S9 plus मध्ये १२ मेगापिक्सलचा रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोनही ६४, १२८ आणि २५६ जीबीमध्ये उपलब्ध असून ४०० जीबीपर्यंत त्याची मेमरी वाढवता येऊ शकते. या फोनवर पाणी राहणार नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Google Pixel 2

काहीसा Apple iPhone X सारखा असलेला हा फोन किंमतीने मात्र कमी आहे. ५ इंचाची फुल एचडी स्क्रीन असलेला हा फोन धूळ आणि पाण्यापासून स्वत:चे उत्तम पद्धतीने संरक्षण करु शकतो. याचा आयपी ६७ ठेवण्यात आला असून या फोनला गोरिला ग्लास देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 1:41 pm

Web Title: waterproof smartphones useful for holi and for other time also
Next Stories
1 ब्रज की होली
2 या आसनाने होईल गॅसेसचा त्रास दूर
3 सापाच्या विषातील घटक संधिवातावर गुणकारी
Just Now!
X