करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखणे आवश्यक आहे. पण, जेव्हा दोन व्यक्ती शरीरसंबंधांच्याओढीने जवळ येतात, तेव्हा असे सोशल डिस्टन्सिंग राखणे ही एक अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा वेळी पुरुष किंवा स्त्री करोनाबाधित असेल, तर जोडीदाराला सुद्धा करोनाची लागण होण्याचा धोक असतो.

सेक्स ही एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे शरीरसंबंधांच्या ओढीने जवळ येणाऱ्या जोडप्यांनी सेक्स करताना काय काळजी घ्यावी, यासंबंधी कॅनडाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे. Covid-19 ची बाधा टाळण्यासाठी सेक्स करताना मास्क घाला तसेच किसिंग टाळा असा सल्ला कॅनडाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर थेरेसा ताम यांनी दिला आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी हस्तमैथुन सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Eating Chavalichi Bhaji Can Cure Thyroid
चवळीच्या भाजीने थायरॉईड बरा होतो का? वजन कमी करताना चवळी किती फायद्याची, तज्ज्ञांची स्पष्ट माहिती, वाचा
how social media influencers affect on our mental health and behavior
‘Hello Guys’ म्हणत इन्फ्ल्युएन्सर्स तुमच्या मनात शिरतात की डोक्यात? मानसोपचारतज्ज्ञांकडून जाणून घ्या कसा होतो परिणाम…

“वीर्यातून करोनाची लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पण अनोळखी व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास करोना व्हायरसची लागण होण्याचा धोका अधिक आहे” असे डॉ. ताम यांनी सांगितले. चेहरे जवळ आले म्हणजेच किसिंग करताना करोनाची लागण होण्याचा धोका सर्वात जास्त आहे असे डॉ. ताम म्हणाल्या. “करोना काळात शारीरीक जवळीक जितकी कमी ठेवाल तितका या आजाराची बाधा होण्याचा धोका कमी होईल तसेच प्रसारही होणार नाही” असे त्या म्हणाल्या. लैंगिक आरोग्य सुद्धा आपल्या शारीरिक आरोग्याचाच एक भाग आहे असे ताम यांनी सांगितले.

लैंगिक संबंधातून करोना पसरतो का? संशोधक म्हणतात…
एप्रिल महिन्यात अमेरिका आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका गटाने वीर्यामधून करोना विषाणूचा प्रसार होत नसल्याचा दावा केला होता. अमेरिका आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका गटाने करोनाची बाधा झालेल्या चीनमधील ३४ प्रौढ पुरुषांच्या वीर्याचे परीक्षण केले. त्यात कुठेही करोनाचे विषाणू आढळले नाहीत. फर्टिलिटी आणि स्टरिलिटी जर्नलमध्ये त्यांनी आपले निष्कर्ष नोंदवले होते. न्यू यॉर्क पोस्ट वेबसाइटने हे वृत्त दिले होते.

न्यू यॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुनाचा सल्ला
मार्च महिन्यात अमेरिकेतील न्यू यॉर्क सरकारने नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला दिला होता. लैंगिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या एका स्टडीने तणाव कमी करण्यासाठी एक उपाय सुचवला होता.

“चुंबनामुळे COVID-19 चा प्रसार होऊ शकतो. दुसरं कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात. साबणाने सेक्स टॉइज आणि हात स्वच्छ धुवत असाल तर, हस्तमैथुनामुळे COVID-19 चा फैलाव होणार नाही” असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने अधिकृत टि्वटर अकाउंटवर म्हटले होते.