लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी बरेच जण घरात बसून वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरात बसून जर तुमचं वजन वाढतंय आणि त्यात तुम्ही वजन कमी करणाच्या अनेक पद्धती आणि उपाय शोधताय तर हा सोपा उपाय तुम्हाला नक्कीच वजन कमी करण्यास मदत करेल.

करोनाच्या काळात गत वर्षापासून आपण सगळे घरी राहून ऑफिसची कामे करत आहोत. दरम्यान या काळात जर तुमचं वजन वाढलं असेल आणि वजन वाढल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या खाण्यापिणाच्या गोष्टीत बदल केला तर तुमचं वजन कमी होऊ शकतं. त्यात तुम्ही कॉफी पिण्याचे शौकिन असाल तर तुमच्याकरता ब्लॅक कॉफीची ही खास रेसिपी आहे जी तुमचं वजन कमी करण्यास मदत करेल. चला तर मग जाणून घेऊयात ब्लॅक कॉफी कशी बनवायची आणि त्याचे फायदे!

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच

साहित्य :

१/२ कप पाणी, १ चमचा कॉफी, १ छोटा चमचा जायफळ पावडर, १ छोटा चमचा दालचिनी पावडर, १ छोटा चमचा कोको पावडर, १ चमचा नारळाचे तेल

कृती :

सर्वात प्रथम पाणी उकळून घ्या. त्यात १ चमचा कॉफी पावडर टाका. त्यानंतर त्यात जायफळ पावडर, दालचिनी पावडर, कोको पावडर टाकून चांगले मिसळा. त्यात १ चमचा नारळाचे तेल टाकून कॉफी चांगली उकळवा. हेल्दी ब्लॅक कॉफी पिण्यासाठी तयार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा व्यायाम करण्याआधी ही कॉफी घेऊ शकता.

ब्लॅक कॉफीचे फायदे :

– ब्लॅक कॉफीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारख्या गोष्टी असतात. अॅन्टी-ऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर रोज एक कप ब्लॅक कॉफी घेतली तर तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील.

– कॉफीमध्ये असलेले जायफळ हा फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे जे तुमचं वजन कमी करण्यास मदत करतात.

– दालचिनी ही शरीरातील चरबी करणाऱ्या हार्मोन्सची मात्रा वाढवते.

– कोको पावडर शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते.

– कॉफीमध्ये नारळाचे तेल देखील वजन कमी करण्यास मदत करते.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा सल्ला घ्या)