21 March 2019

News Flash

‘हे’ आहेत लेमन टी पिण्याचे फायदे

आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त

हल्ली अनेकजण आपल्या आरोग्याबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे व्यायाम आणि आहाराला आरोग्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. चहा म्हणजे भारतीयांचा वीक पॉईंट म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. मात्र मागच्या काही काळापासून चहा आणि कॉफी आरोग्यासाठी चांगली नसते याबाबत बरीच चर्चा झाली. मग अनेकांनी सामान्य चहा घेणे बंद केले. मात्र त्यामुळे ब्लॅक टी, लेमन टी यांसारख्या गोष्टींची मागणी वाढली. लेमन टी बनवणे सोपे असून तो शरीराचा क्लिंझर म्हणून उपयुक्त ठरतो. आता यामध्ये असे कोणते घटक असतात ज्याचे आरोग्याला फायदे होतात. याबाबत फारच कमी जणांना माहिती असते. पाहूयात लेमन टी पिण्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे…

लेमन टी म्हणजे नेमके काय?

लेमन टी म्हणजे कोरा चहा ज्यामध्ये लिंबू पिळलेले असते. लिंबामुळे या चहाला वेगळी चव येते. यामध्ये पाणी, चहा, साखर आणि लिंबू इतकेच असते. चहात लिंबू पिळल्याने त्याची केवळ चवच नाही तर रंगही बदलतो.

क्लिंझर आणि डिटॉक्सिफायर

शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी लेमन टीचा उपयोग होतो. याबरोबरच शरीरात असणारे विविध संसर्ग आणि आजार दूर होण्यासही लेमन टी उपयुक्त ठरतो.

सर्दी आणि तापावरील उपचार

लेमन टीमुळे सर्दी आणि ताप कमी होण्यास मदत होते. या चहाचा जास्त उपयोग व्हावा यासाठी यामध्ये थोडे आले टाकल्यास फायदा होतो. असा आले घातलेला चहा घेतल्यास घसेदुखीवरही आराम मिळतो. तसेच यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच पावसाळी वातावरणात वाजणारी थंडी यामुळे कमी होण्यास मदत होते.

नैसर्गिक अँटीसेप्टीक

लिंबामध्ये निसर्गत: अँटीसेप्टीक गुण असतो. लेमन टीमध्ये अँटी बॅक्टेरीयल आणि अँटी व्हायरल घटक असतात. त्यामुळे एखाद्याला आधीपासून काही इन्फेक्शन किंवा आजार असतील तर ते बरे होण्यास मदत होते.

त्वचेसाठी उपयुक्त

आपली त्वचा छान नितळ असावी असे आपल्यातील बहुतांश जणांना वाटते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. तसेच लिंबामध्ये अॅस्ट्रींजंटचे घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होण्यास तसेच त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

First Published on June 13, 2018 6:16 pm

Web Title: what are the health benefits of lemon tea