उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शांत झोप लागणे नक्कीच आवश्यक असते. पण कित्येकदा असा शांत झोपलेला माणूस घशातून खर्जातला, तालबद्ध, मोठा आवाज काढून घोरतो आणि आजूबाजूच्यांचीही झोप उडवतो. घोरणाऱ्या व्यक्तीला गाढ झोप लागल्यामुळे पत्ताही नसतो की आपण एवढे नादबद्ध घोरतोय. या घोरण्यावर घराघरांमध्ये अनेक चर्चा रंगतात. मग काहीजण आपल्याला घरगुती उपायही सुचवतात. मात्र वैद्यकीयदृष्ट्या घोरणे हा एक आजार समजला जातो. त्यामुळे त्याची विशिष्ट लक्षणे आणि उपाय आहेत. ते समजून घेणे आवश्यक असते. या घोरण्याच्या विकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

या समस्यांना सामोरे जावे लागू शकते

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

१. उच्च रक्तदाब

२. हृदयविकार

३. श्वसनरोध- याला ‘स्लीप अॅप्निया’ म्हणतात. यामध्ये झोपेत श्वास अचानक पूर्ण बंद होतो.

४. पक्षाघात- अर्धांगवायूचा झटका

५. घोरण्यामुळे श्वसनमार्गावर ताण निर्माण होतो आणि शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. साहजिकच हृदयाच्या कार्यावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

६. दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, कामात लक्ष न लागणे, विद्यार्थ्यांचे शाळा-कॉलेजात दुर्लक्ष होणे

७. मानसिक चिडचिड, चिंता, नैराश्य या समस्या निर्माण होतात.

घोरणे टाळण्यासाठी 

१. बेसुमार वजनवाढ, विशेषतः पोटाचा घेर सुटल्याने हा त्रास होतो. त्यामुळे व्यायाम करून वजन कमी करावे.

२. पोटाच्या व्यायामाकडे विशेष लक्ष द्यावे. पोटासाठी विशिष्ट योगासने, अॅबडॉमिनल क्रन्चेस उपयुक्त ठरू शकतात.

३. पन्नाशीच्या पुढील व्यक्तींनी एक तास भरभर चालण्याचा व्यायाम करावा.

४. झोपताना उताणे झोपल्यास घोरणे नक्की सुरू होते. त्यामुळे कुशीवर झोपावे. आपल्या समवेत झोपलेल्या व्यक्तीने घोरण्याची तक्रार केल्यास कुशी बदलून झोपावे.

५. जर तुम्ही घोरताय म्हणून उठवले गेलात तर थोडे उठून बसा, पाणी प्या आणि कूस बदलून झोपा.

६. सर्दीने नाक चोंदल्यामुळे तोंडाने श्वास घेतला जातो आणि घोरण्याचा प्रकार होऊ शकतो. याकरिता सर्दी झाली असल्यास रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात आणि गरम पाण्याचा वाफारा घ्यावा.

७. सर्दीने नाक जास्तच चोंदत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नाकात फवारण्याचा नेझल-स्प्रे वापरावा.

८. नाकात घुसवून वापरण्याची तथाकथित इन्हेलर्स वापरू नयेत. त्याने काही क्षणांसाठी नाक मोकळे होते, पण पुन्हा दुपटीने ते चोंदते.

९. सतत वरचेवर ज्यांना सर्दी होते अशांचे नाकाचे हाड वाढलेले असते. त्यांनी त्यासाठी तपासणी करून आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करून घ्यावी.

१०. झोपेत घोरताना जर श्वास बंद पडत असेल, तो स्लीप अप्निया असतो. याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन