आपल्या आरोग्यासाठी शुद्ध तुपाचं महत्त्व मोठं आहे. प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात हमखास दिसणारा आणि असंख्य पाककृतींमध्ये एक अद्भुत चव आणणारा आणि त्या पदार्थाला समृद्ध करणारा हा घटक आहे. वर्षांनुवर्षे अगदी पारंपरिक पद्धतीने तुपाचा वापर विशिष्ट पदार्थांमध्ये केला जातो. आपल्याला लहानपणापासून आपली आई, आजी या तुपाचं महत्त्व वारंवार सांगत आल्या आहेत. गरमागरम वरण-भातावर, मऊसूद पुरणपोळी आणि ताज्या मोदकावर शुद्ध तुपाची धार नसेल तर जेवल्यासारखं वाटेल का? नाही ना. चवीला जितका अप्रतिम तिचा आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असा हा घटक.

पण काही वर्षांपूर्वी तुपाला नावं  ठेवण्याचं एक फॅड आलं होतं. वजन कमी करण्यासाठी उत्सुक मंडळी तूप खाणं सोडाच तर पण तुपकडे बघतही नव्हती. असं म्हटलं जात होतं कि, तुपाचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील चरबी वाढते, रक्तवाहिन्या बंद होतात, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो इ अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. परंतु थोड्याच दिवसांमध्ये अभ्यासांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे सिद्ध केले. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, शुद्ध तुपाचं योग्य प्रमाणात केलेलं सेवन हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, चयापचय शक्ती वाढवतं. त्याचप्रमाणे, तूप आपली हाडं आणि त्वचेसह एकंदरच शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे देतं.

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Summer heat
Health Special : उन्हाळ्याची झळ लागू लागली; काय काळजी घ्याल?

योग्य पदार्थावर, योग्य प्रमाणात आणि पारंपरिक पद्धतीप्रमाणे होत आलेला तुपाचा वापर हा आपल्यासाठी अत्यंत गुणकारी असतो. परंतु, ‘योग्य प्रमाणात’ हा शब्द पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि तुपाचं योग्य प्रमाण म्हणजे नेमकं किती? आज आपण याच महत्त्वाच्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.

हृदयाच्या आरोग्यासाठी तूप चांगलं आहे का? अभ्यासानुसार…

तूप हा पारंपरिक पद्धतीने प्रत्येक भारतीय स्वयंपाकासह आपल्या गुणधर्मांमुळे आयुर्वेद आणि सिधा औषधांसारख्या प्राचीन औषधांमध्ये वापरला जाणारा एक उत्कृष्ट घटक मानला जातो. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणन्यानुसार, तूप हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हा दावा फोल ठरला आहे.तूप हे हेल्थी फॅट्स व्हिटॅमिन ए, ई, के आणि डी च्या चांगल्या घटकांनी संपन्न आहे. तुपातील पोषक घटकांची रचना नैसर्गिकरित्या हाडांचं आणि हृदयाचं आरोग्य, मेंदूचं कार्य सुधारू शकते. शिवाय, तुपामधील अँटी इंफ्लामेंट्री गुणधर्म शरीरातील जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. त्याचसोबत तुपाच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि इतर पाचक आजारांपासून देखील मुक्तता होते. चयापचय शक्ती वाढते आणि एलर्जी, फ्लू, सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती सुधारते. त्यामुळे तुपाचे नियमित सेवन नैसर्गिकरित्या एकूणच आरोग्य वाढवू शकते. पण कोलेस्टेरॉलच्या पातळीचं काय? तूप खरोखरच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर ह्याच उत्तर आहे ‘हो’.

तुपाचं योग्य प्रमाण किती?

अभ्यासानुसार, दुधातील प्रथिनं आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडच्या उपस्थितीमुळे तुपाचं मध्यम प्रमाणात केलेलं सेवन हळूहळू आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं. परंतु, तुमचं तूप खाण्याचं प्रमाण किती आहे ह्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. कारण, मुळातच तूप हे सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. त्यामुळे खूप जास्त प्रमाणात तुपाच्या सेवनाने वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू शकतो. म्हणूनच आरोग्यतज्ञ आणि पोषणतज्ञांच्या मते, दररोज २-३ चमचे तूप तुमच्या आहारात समाविष्ट करणं सर्वात योग्य ठरतं. इतक्या प्रमाणात केलेलं तुपाचं सेवन हे हृदय निरोगी ठेऊ शकतं आणि एकंदरच संपूर्ण आरोग्य सुधारू शकतं.

तुपाने पदार्थाची मूळ चव झाकू नका!

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर या अनेकदा आपल्या आरोग्यसाठीचं तुपाचं महत्त्व सांगत असतात. रुजुता दिवेकर यांनी आता देखील आपल्या फेसबुक हँडलवर रोजच्या आहारात तूप वापरण्याचा योग्य मार्ग शेअर केला आहे. त्या म्हणतात कि, कोणत्याही पदार्थाची मूळ चव मास्क करण्यापेक्षा (झाकून टाकण्यापेक्षा) त्या पदार्थाचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी तुपाचा वापर केला पाहिजे.” तुपाचा वापर हा पूर्णपणे आपल्यासमोर कोणता पदार्थ आहे यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ: जर तुम्ही दाल बाटी चुरमामध्ये दाल चावलपेक्षा तुलनेत तुपाचा वापर थोडा जास्त होईल. परंतु, तरीही एखाद्या व्यक्तीने एका दिवसात २-३ चमच्यापेक्षा जास्त तूप खाऊ नये.