News Flash

…म्हणून रस्त्याच्या कडेचे मैलाचे दगड वेगवेगळ्या रंगांचे असतात

जाणून घ्या कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो

या दगडांवर गाव, शहरांची नावे त्यांच्या अंतरासहीत दर्शवलेली असतात (फोटो: फ्लिकर्सवरून)

कुठेही प्रवासाला निघाल्यावर रस्त्याच्या बाजूला किलोमीटरचे आकडे दाखवण्यासाठी लावलेले दगड आपले लक्ष्य वेधून घेतात. या दगडांवर  गाव, शहरांची नावे त्यांच्या अंतरासहीत दर्शवलेली असतात. मात्र अनेकदा या दगडांचे रंग वेगवेगळे का असा प्रश्न पडतो. म्हणजे काळा, पिवळा, हिरवा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगानी या दगडांचे शेंडे रंगवले जातात. आता त्यामागेही खास कारणं आहे. हा प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. मात्र अनेकांना त्या रंगाचा अर्थ ठाऊक नसतो. लांबच्या प्रवासाला जाताना या दगडांच्या रंगांवरून अंतराचा आणि रस्त्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. म्हणूनच जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या दगडाचा काय अर्थ असतो.

हिरवा-पांढरा दगड
हिरवा-पांढऱ्या मैलाचा दगड राज्य महामार्ग सुचित करतो.  या रस्त्यांच्या देखरेखीची जबाबदारी राज्य सरकारची असते.

पिवळा-पांढरा दगड
पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड राष्ट्रीय महामार्ग दर्शवण्यासाठी वापरला जातो. जर रस्त्याच्याकडेला पिवळ्या पांढऱ्या दगडांवर अंतर लिहीलेले दिसले तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात असे समजावे. पिवळा-पांढऱ्या रंगाचा दगड हा राष्ट्रीय महामार्गावरच वापरला जातो.

नारंगी-पांढरा दगड
नारंगी-पांढऱ्या रंगाच्या दगडाचा अर्थ असा होतो की तो रस्ता ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने’अंतर्गत बांधण्यात आला आहे. मुख्य महामार्गापासून एखाद्या गावाला जोणाऱ्या रस्त्यावर हे नारंगी पांढरे दगड दिसतात.

निळा किंवा काळा पांढरा दगड
प्रवासादरम्यान निळ्या आणि पांढऱ्या किंवा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा दगड दिसल्यास तुम्ही एखाद्या मोठ्या शहराजवळ आहात असे समजावे. हे  रस्ते त्या शहराच्या जिल्ह्याच्या अंतर्गत असतात. जिल्हा प्रशासन त्यांच्या देखरेखीची काळजी घेते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 6:26 pm

Web Title: what indicates the milestone colour representation on indian roads
Next Stories
1 ‘ही’ लक्षणे दिसत असल्यास तुमची झोप पूर्ण झालेली नाही असे समजावे!
2 चांगल्या आरोग्यासाठी नवीन वर्षापासून करा या सहा गोष्टी
3 २०१७ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेला फोन माहितीये?
Just Now!
X