भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्या ६७ वर्षाच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसतेय. जाणून घेऊयात कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे काय…

जाणून घेऊयात कार्डिअ‍ॅक अरेस्ट Cardiac Arrest म्हणजे नेमके काय?
आपल्या हृदयाची क्रिया अचानक बंद पडते तेव्हा कार्डिअ‍ॅक अरेस्ट येतो. कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये Cardiac Arrest रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. रक्ताभिसरण बंद झाल्याने अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो. मेंदूला होणारा एक रक्तपुरवठाही बंद होतो आणि मृत्यू होतो. हृदयविकार नसेल तरीही कार्डिअ‍ॅक अरेस्ट येऊ शकतो.

Amar Singh Chamkila Son jaiman
“त्यांच्या पहिल्या पत्नीपासून…”, सावत्र आईच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे अमरसिंग चमकीला यांचा मुलगा, म्हणाला…
Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
ramdas athawale meets with car accident
सातारा:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात; पत्नी किरकोळ जखमी

कार्डिअ‍ॅक अरेस्ट येणाऱ्या लोकांपैकी २५ टक्के लोकांना तर कोणतीही अस्वस्थता किंवा काही लक्षणेही जाणवत नाही. बऱ्याचदा उलटी होणे, अशक्तपणा, श्वास घेण्यासाठी त्रास होणे, चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्टची लक्षणेही असू शकतात. ‘फर्स्ट पोस्ट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. ही लक्षणे जरी असली तरीही कार्डिअ‍ॅक अरेस्ट अचानक येऊ शकतो. कार्डअ‍ॅक अरेस्ट आल्यानंतर ५० टक्के लोकांचा मृत्यू होतो असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

छातीत अचानक कळ येते तेव्हा हृदयविकाराचाच झटका असतो असा समज आहे. मात्र छातीत दुखणे हा कार्डिअ‍ॅक अरेस्टही असू शकतो. हृदय विकाराचा त्रास असणाऱ्यांना कार्डिअॅक अरेस्ट येण्याची शक्यता जास्त असते.

काय आहेत लक्षणे –
– कोरोनरी हार्टचा आजार
– हार्ट अ‍ॅटॅक
– कार्डियोमायोपॅथी
– काँजेनिटल हार्टचा अजार
– हार्ट वॉल्वमधील अडथळे
– हार्ट मसल्समधील इन्फ्लेमेशन
– लाँग क्युटी सिंड्रोमसारखे डिसऑर्डर
– याशिवाय इतरही काही कारणं आहेत, जे कार्डिअॅक अरेस्टला निमंत्रण देऊ शकतात :
– विजेचा झटका बसणं
– प्रमाणापेक्षा जास्त ड्रग्ज घेणं
– हॅमरेज, ज्यात रक्तस्राव होतो
– पाण्यात बुडणं