News Flash

सोशल मीडियावर व्हायरल होतंय Photo Lab अ‍ॅप, जाणून घ्या काय आहे हे

दहा कोटींपेक्षा जास्त जणांनी अ‍ॅप केलं डाउनलोड

सोशल मीडियावर व्हायरल होतंय Photo Lab अ‍ॅप, जाणून घ्या काय आहे हे

Facebook, Whatsapp आणि इतर सोशल मीडियावर सध्या कार्टून किंवा पेंटींग असलेले फोटो अनेकजण पोस्ट करत आहेत. हे आकर्षक फोटो Photo Lab अ‍ॅपमध्ये तयार करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या Photo Lab अ‍ॅपला अल्पावधीतच दहा कोटींपेक्षा जास्त जणांनी डाउनलोड केलं आहे. अँड्रॉइडसह आयओएस (IOS) प्लॅटफॉर्मवरही हे अ‍ॅप उपलबद्ध आहे. Photo Lab अ‍ॅपला गूगल (Google) प्ले स्टोर (Play Store) आणि अ‍ॅपल (Apple) अ‍ॅप स्टोर (APP Store)मधून डाउनलोड करु शकता.

गेल्या काही दिवसांपासून हटके अशा Photo Lab या अ‍ॅपला लोकांनी चांगलीच पंसती दर्शवली आहे. अल्पवधीतच लोकप्रीय झालेल्या या अ‍ॅपमध्ये फोटो एडिटिंगचे ९०० पेक्षा जास्त पर्याय उपलबद्ध आहेत. Photo Lab हे अ‍ॅप व्हायरल होत असून प्रत्येकजण डाउनलोड करत आहे. या अ‍ॅपचे फोटो एडिटिंग टूल्स आणि फिल्टर्स इतर अ‍ॅपच्या तुलनेत भन्नाट आहेत.यामधील कार्टून लूक असेललं फिल्टर सध्या सोशल मीडयावर धुमाकूळ घालत आहे. त्यासोबतच फोटो फ्रेम, एनिमेटेड इफेक्ट्स यासारखे अनेक टूल्स आहेत.

Photo Lab हे एक मोफत अ‍ॅप आहे. या मोफत अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना बेसिक अ‍ॅप फिचर मिळतात. यापेक्षा चांगले फिचर्स हवे असतील तर प्रिमियम व्हर्जन अ‍ॅप घ्यावं लागेल. फोटो लॅब या अ‍ॅपचे प्रिमियम व्हर्जन तीन दिवसांसाठी मोफत असून त्यानंतर ३२० रुपयांचं शुल्क भारवं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 11:33 am

Web Title: what is photo lab heres how you can make your ai cartoon portrait nck 90
Next Stories
1 “मी आतापर्यंत कधीच टिकटॉक डाउनलोड केलं नाही, पण नुकतंच…” : आनंद महिंद्रा
2 २५ लाखांहून जास्त डाउनलोड, ‘या’ Made in India अ‍ॅपची टिकटॉकला तगडी टक्कर
3 चीनला विरोध, Zomato च्या कर्मचाऱ्यांनी जाळले कंपनीचे टी-शर्ट
Just Now!
X