14 November 2019

News Flash

राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांना झालेला टेनिस एल्बो नक्की आहे तरी काय?

जाणून घ्या टेनिस एल्बो कसा होतो आणि त्यावरील उपचार काय

राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी भारत भालके आले होते. त्यावेळचे फोटो ‘MNS Adhikrut’ ने ट्विट केले आहेत. या ट्विटमधल्या एका फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येते आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाला आहे. हीच व्याधी याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेता अजय देवगणलाही झाला होता. पण टेनिस एल्बो म्हणजे नक्की काय आहे आणि तो कसा होतो याबद्दलची माहिती अनेकांना नसते. मात्र ही व्याधी काय आहे आणि तो कसा होतो यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत.

या व्याधीचे नाव टेनिस एल्बो असं असलं तरी ही व्याधी टेनिस खेळाडूंना होतो हा गैरसमज आहे. अनेकदा काही फेकण्याच्या आणि मैदानी खेळ तसेच अॅथलिटीक्स खेळाडूंना ही व्याधी होते. कोपराचा अतिवापर केल्याने ही व्याधी होते. गृहिणी तसेच जास्त वेळ व्यायामशाळेत जाणाऱ्या लोकांना ही व्याधी होते. कोपराच्या बाहेरील बाजूस म्हणजेच आपण कोपर टेकवून बसतो त्या भागात प्रचंड वेदना होतात. कोपराजवळील स्नायूंची हलचाल झाल्याने ही व्याधी होते. विशेष म्हणजे कोपराजवळ ही व्याधी होत असली तरी तेथील स्नायूंमुळे मनगटांच्या हलचाली अवलंबून असतात. त्यामुळेच टेनिस एल्बोची व्याधी झालेल्यांना मनगटाजवळही वेदना होतात. मनगट उचलण्याचा प्रयत्न केल्यास कोपराजवळ प्रचंड वेदना होतात. टायपिंग करणे, एकादी गोष्ट पकडणे यासारख्या गोष्टीही करणे अशक्य होते.

सामान्यपणे मध्यम वयाच्या रुग्णामध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. मात्र खेळाडूंना हा नियम लागू होत नाही. त्यांना ही व्याधी कधीही होऊ शकते. क्रिडा श्रेत्राबरोबरच खास करुन हाताना काम असलेल्या श्रेत्रातील लोकांना ही व्याधी होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये रंगकाम करणारे व्यक्ती, सुतार, चित्रकार नेहमी व्यायामशाळेत जाणारे तरुण यांचा समावेश होतो.

दोन्ही कोपरांना ही व्याधी होण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. मात्र केवळ सोनोग्राफी किंवा एमआरआयसारख्या चाचण्यांनी या व्याधीचे पूर्णपणे निदान होत नाही. त्यामुळेच हाडांचे डॉक्टरांकडून (ऑर्थोपेडिक सर्जन) या व्याधीचे अचूक निदान करता येते.

उपचार काय

टेनिस एल्बोवरील उपचारांमध्ये अल्ट्रा साऊंड तंत्रज्ञान, हीट थेअरपी, आयएफटी आणि फिजिओथेरपीचा समावेश होतो. अनेकदा डॉक्टर मनगटाच्या स्नायूंचे व्यायाम डॉक्टर सुचवतात. याचाही काही फायदा झाला नाही तर वायानुसार रुग्णांना कोपराच्या भागावर स्टेरॉइडची इंजेक्शन दिले जाते. अगदी अल्पप्रमाणामध्ये स्टेरॉइडचा डोस दिला जातो.

अनेकदा प्रवासात असताना किंवा अगदीच खूप त्रास होत असल्याने पेनकिलर दिले जाते. मात्र तो तात्पुरता उपचार असतो. आराम करणे हा उपचार नाही.

योग्य व्यायाम करणे हाच एकमेवर उपचार टेनिस एल्बोवर आहे. अनेकदा केवळ कोपराला ताण देण्यावर आणि कोपर सशक्त करण्यावर रुग्णांचा भर असतो. कोपर सरळ करुन मनगटाला ताण देण्याचा व्यायाम खूपच प्रचलित आहे. ही उपचार पद्धती बऱ्याच प्रमाणात परिणामकार असल्याचे दिसते. पारंपारिक पद्धतीच्या उपचाराने परिणाम होतो. बहुतांश वेळा शस्रक्रिया न करताच टेनिस एल्बो बरा होतो.

First Published on November 7, 2019 2:48 pm

Web Title: what is tennis elbow causes symptoms risk factors scsg 91