थंडीचे दिवस आहे त्यामुळे ओठ फाटण्याची समस्या अनेकांना असते. एकवेळ पायाला पडलेल्या भेगा लपवता येतील पण ओठांचीही समस्या लपवता येत नाही. ओठ हे खूप नाजूक असतात म्हणूनच त्यांची काळजी घेणे खूपच गरजेच असते. अनेक महिला हिवाळ्यात ओठांची काळजी घेण्यासाठी लिप बामचा वापर करतात. पण लिप बामचा वापर कधी आणि केव्हा करावा हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

वाचा : काही सेकंदात झोपी जाण्यासाठी हा उपाय करुन पाहा

* जर तुम्ही जास्त वेळ एसीमध्ये काम करत असाल तर लिप बाम जरूर वापरा. कारण एसीमध्ये बसून ओठ रुक्ष होऊ शकतात म्हणून अशा वेळी लिप बामचा वापर करा.
* थंडीच्या दिवसात संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही बाहेर फिरायला जात असाल तर ओठांवर लिप बाम जरूर लावा कारण थंड हवेमुळे ओठ रुक्ष होऊ लागतात आणि ओठ फाटण्याची शक्यता अधिक असते. ओठांना मॉइस्चराइजर आवश्यक असते अशा वेळी लिप बामचा वापर करा.
* ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी एक हलकासा कोट लिप बामचा लावा आणि त्यानंतर ओठांवर लिपस्टिक लावा.
* लिप बामचा वापर फक्त थंडीत करावा असा समज चुकीचा आहे. दुपारच्या वेळी बाहेर पडण्यापूर्वी युव्ही किरणांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण सनस्क्रिन वापरतो. तसेच ओठांचे युव्ही किरणांपासून रक्षण करण्यासाठी युव्ही प्रोटक्टेड लिप बाम जरूर वापरा. ओठ हे नाजूक असतात तसेच मेलानिनच्या कमतरतेमुळे सूर्यकिरणांमुळे ओठांना हानी पोहचू शकते म्हणूनच दुपारच्या वेळी बाहेर पडण्यापूर्वी लिप बामचा वापर करा.
* पण सतत लिप बामचा वापर करणेही धोक्याचे ठरू शकते. आजकाल बाजारात सुंगधी आणि वेगवेगळ्या शेड्स असणारे लिप बाम आले आहेत पण यात असणा-या रसायनांमुळे ओठांना अॅलर्जीही होऊ शकते त्यामुळे शक्यतो पारदर्शक रंगाचे लिप बाम निवडा.

वाचा : ‘हे’ आहे जगातील सगळ्यात महागडे आइस्क्रीम