गर्भधारणेच्या काळात घेतलेल्या अल्कोहोलमुळे नुकत्याच जन्मलेल्या शिशूवर काय परिणाम झाले आहेत याचे विश्लेषण रक्ताच्या चाचणीतून करणे शक्य असल्याचा दावा भारतीय मूळ असलेल्या एका संशोधकांच्या समूहाने केला आहे.

या संशोधनामुळे लहान वयातच अल्कोहोलच्या विपरीत परिणामांमुळे बाधित मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी  उपयुक्त असल्याचाही दावा अमेरिकेतील सॅन दिएगो ऑफ कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

अल्कोहोलमुळे नवजात बालकात येणारी विशिष्ट प्रकारची विकृती, जी मानसिक आणि शारीरिक स्वरूपाची असून वैद्यकीय परिभाषेत ज्याला स्पेक्ट्रम डिसऑर्डर (विकार) (एफएएसडी) असेदेखील संबोधले जाते. अमेरिका आणि युरोपच्या पश्चिमेकडील भागात साधारण २ ते ५ टक्के शालेय मुलांमध्ये या (एफएएसडी) विकाराची लक्षणे आढळली असून उर्वरित भागात हे प्रमाण अधिक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

लहान मुलांत आणि वयस्कांमध्ये आढळणाऱ्या या (एफएएसडी) आजारामध्ये शारीरिक व्यंग, जसे जन्मत:च डोके लहान असणे, शिकण्यातील सूक्ष्म बदल समजण्यात येणाऱ्या अडचणी आणि वर्तणुकीविषयीच्या काही समस्याही उद्भवतात. अमेरिकेत याविषयी विविध माध्यमांतून गर्भवती महिलांचे प्रबोधनही केले जात आहे. मात्र तरीही गर्भारपणात केल्या जाणाऱ्या अल्कोहोल सेवनामळे होणाऱ्या विपरीत परिणामांविषयीचे गांभीर्य अजूनही महिलांमध्ये दिसत नाही. त्यामुळे ही समस्या अधिकच क्लिष्ट स्वरूप धारण करीत आहे. यासाठी संशोधकांना वेस्टर्न उक्रेनमधील एका क्लिनिकमधील गर्भधारण केलेल्या ६८ महिलांच्या आरोग्य, अल्कोहोल सेवनाचा इतिहास, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली. या वेळी अल्कोहोलच्या सेवनामुळे आईच्या रक्तातील मायक्रोआरएनएएस (एमआयआरएनए) होणारे विपरीत परिणाम दिसून आले. संशोधकांच्या मते, पहिल्या १२ महिन्यांच्या कालखंडात शारीरिक आणि वर्तणुकीशी निगडित दुष्परिणाम दिसून आले.

 (टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)