News Flash

व्याज दर वाढतात तेव्हा काय करावे?

व्याज दरांच्या वाढीची अपेक्षा करुन बॅंकांनी आधीच ठेवी आणि कर्जांवरचे व्याजदर आरबीआयची घोषणा येण्यापूर्वीच सक्रियपणे वाढवले

गेल्या चार वर्षांमध्ये आरबीआयने रेपो दर २५ बीपीएसने सर्वप्रथम वाढवला आहे. २०१४ ते २०१७च्या दरम्यान आपण रेपो दर सात वेळा कमी होताना पाहिला. ग्राहकांना स्वत कर्जाच्या मार्गाने लाभ मिळाला. पण त्यांनी मुदत ठेव आणि पीपीएफसारख्या लहान बचत योजनांवर अतिशय कमी परतावा मिळवला, ज्यामुळे त्यांना काही वर्षे सर्वात कमी परतावा मिळाला. व्याज दरांच्या वाढीची अपेक्षा करुन बॅंकांनी आधीच ठेवी आणि कर्जांवरचे व्याजदर आरबीआयची घोषणा येण्यापूर्वीच सक्रियपणे वाढवले. रोखीच्या कमी होणा-या लिक्विडिटीमध्ये ठेवी वाढवण्यासाठी देखील हे देऊ केले जात आहे. या स्थितीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करण्यासाठी ग्राहक काय करु शकतील पाहूया…

१. दीर्घकालीन डेब्ट फंडांमधून बाहेर पडणे 

डेब्ट म्युच्युअल फंड विविध श्रेणींमध्ये येतात. आताच्या मॅक्रोइकोनॉमिक किंवा बृहद आर्थिक परिस्थितीत लिक्विड फंड्स किंवा लघु कालावधी फंडांची निवड करणे सर्वोत्तम ठरेल. यामुळे दीर्घकालीन फंडांची अस्थिरता न राहता मध्यम स्वरुपातला परतावा मिळू शकतो. व्याज दर वाढीच्या स्थितीत दीर्घकालीन बाँड्स सर्वात जास्त प्रमाणात अस्थिर असतात. पैसे गमावणे टाळण्यासाठी तुम्ही तुलनेने कमी मॅच्युरीटी कालावधी असलेल्या सिक्युरिटीजसोबत फंडांची तात्काळ निवड केली पाहिजे.

२. रिफायनान्स किंवा पुन्हा वित्त सहाय्य केलेली कर्जे

कर्जांवरचे व्याजदर केवळ मार्जिनल तत्वावर वाढले आहेत. घर किंवा कारसाठी दीर्घकालीन कर्ज घेण्यासाठी ही अतिशय चांगली वेळ आहे कारण ही कर्जे ८.५ टक्के श्रेणीत आकर्षकरित्या मूल्य करण्यात आलेली आहेत. ती पुढे आणखीन वाढण्याआधी तुम्ही तुमच्या खरेदीला वित्तपुरवठा करण्यासाठी नवीन कर्ज घेऊ शकता. जर तुम्ही अधिक व्याज दर देत असाल, तर अजूनही तुम्ही तुमच्या कर्जांना पुन्हा वित्त सहाय्य करण्याचा आणि आणखीन स्वस्त कर्जांना निवडण्याचा विचार करु शकता.

३. कमी मूल्यांकन असलेल्या बाँड्स व ठेवींमधून बाहेर पडावे

तुम्ही कदाचित डेब्ट साधनांची खरेदी केलेली असेल उदा. कार्पोरेट बाँड्स किंवा कार्पोरेट डिपॉझिट्स. ती क्रेडिट रेटिंग्ज किंवा मूल्यांकनासह येतात. सर्वात जास्त मूल्यांकन उदा. AAA, AA, A, A+ असलेल्या सिक्युरिटीज सर्वात जास्त प्रमाणात सुरक्षित असतात. जोखीम असलेल्या सिक्युरिटीजची रेटिंग्ज किंवा मूल्यांकने कमी असतात उदा. B, C, D, इ. यामुळे तुम्हाला वचन दिलेले व्याजाचे उत्पन्न न मिळण्याची जोखीम जास्त असते. सर्वात दुर्दैवी स्थितींमध्ये कदाचित तुम्हाला तुमच्या मुद्दलाची रक्कम देखील मिळू शकत नाही. जेव्हा व्याज दर वाढतात तेव्हा कमी मूल्यांकन बाँड्स किंवा ठेवी देणाऱ्या कॉर्पोरेट ऑफरिंग्जना या डेब्ट्सना सांभाळण्यात सर्वात जास्त आव्हान वाटेल. त्यामुळे ते परताव्यामध्ये अयशस्वी ठरु शकतात. म्हणून अशा धोकादायक साधनांमधून लवकरात लवकर बाहेर पडणे कधीही उत्तम ठरते.

४. आधीच्या कर्जांचा अग्रिम परतावा करणे किंवा ती फेडणे

जर तुम्ही गृह कर्ज किंवा वाहन/कार कर्ज घेण्याच्या निर्णयापर्यंत आला असाल तर दीर्घकालावधीसाठी तुमच्या व्याजाच्या खर्चामध्ये लक्षणीयरित्या वाढ होईल. तुम्ही मुद्दलाचा अग्रिम भरणा करुन या धक्क्याची तीव्रता कमी करु शकता. जर तुमचे कर्ज संपत आले असले तर तुम्हाला वाढते व्याज दर टाळण्याचा किंवा तुमचा कालावधी वाढवण्याऐवजी त्याचे वेळेआधीच समापन करण्याचा मोह होऊ शकतो. हा अतिशय चांगला विकल्प आहे. त्याऐवजी गृह कर्जाच्या स्थितीत तुम्हाला कर लाभ मिळतात त्यामुळे जर तुम्ही कालावधीच्या समाप्तीच्या जवळ असाल तर कर कपातीवरील उत्पन्नासाठी तुम्हाला कर्ज पुढे ठेवण्याची देखील इच्छा होऊ शकते.

५. एफडी बाजारपेठेचा मागोवा घेणे

वाढणा-या व्याजदरांसोबत तुम्ही मुदत ठेवींवर उच्च परतावा मिळवणे सुरु कराल. परंतु बहुतांश लहान ठेवीदारांसाठी जुन्या ठेवी मोडून नवीन ठेवींमध्ये गुंतवणूक करणे अर्थहीन ठरेल. उदा. ६.५ टक्क्यां‍च्या मुदत ठेवीमधून ६.७५ टक्क्यांच्या ठेवीत गुंतवणूक करण्यामुळे परताव्यात फारसा फरक पडणार नाही, अजून दंड सोसावा लागेल. पण एकदा तुमचे उत्पन्न विचाराधीन घेण्यायोग्य झाले की तुम्ही या विकल्पाचा विचार करु शकता. परंतु ६.५ टक्क्यांच्या मुदत ठेवीतून ८ टक्क्यांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक करणे नक्कीच हितावह ठरेल. परंतु, व्याजदर त्या उंचीपर्यंत पुन्हा पोहोचण्याआधी अजूनही वेळ आहे.

६. पुन्हा लहान बचतीकडे वळणे

पीपीएफ, सुकन्या समृध्दी आणि एनएससीसारख्या योजना अतिशय उत्तम आहेत. त्यांना शासनाचे समर्थन असते, तुम्हाला ८०सी अन्वये कर वाचवण्याची मुभा मिळते आणि तुम्ही कर सक्षम पध्दतीने परतावा देखील मिळवू शकता, कारण तुमचे उत्पन्न संपूर्णपणे करपात्र नसते. यापैकी काही योजना खाली घसरणा-या व्याज दरांमुळे काहीशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे दरात पुन्हा वाढ झाल्यास त्यांना पुन्हा विचारात घेतले गेले पाहिजे.

आदिल शेट्टी

सीइओ, बॅंकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 6:58 pm

Web Title: what to do when interest rates are rising
Next Stories
1 Xiaomi Redmi Y2 बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
2 Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय? ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा
3 आयडियाचा १४९ रुपयांचा नवा प्लॅन; एअरटेल आणि बीएसएनएलला टक्कर
Just Now!
X