फेसबुकच्या वेगवेगळ्या फिचर्सबाबत आपण सातत्याने वाचत असतो. कंपनीकडून यामध्ये सातत्याने विविध बदलही करण्यात येतात. त्यामुळे या मीडियाचा वापर करणे सोपे होते. पण यामध्ये आणखीही असे अनेक फिचर्स आहेत ज्याबाबत आपल्याला माहिती नाही. यातील सगळ्यात महत्त्वाचे आणि आपल्याला माहीत नसणारे फिचर म्हणजे आपल्या मृत्यूनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटचे नेमके काय होते? तर फेसबुक अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये असे एक सेटिग आहे, ज्यामुळे तुम्ही आता या जगात नाहीत हे फेसबुकवर स्पष्ट होऊ शकते. आता यासाठी काय करावे लागते ते जाणून घेऊया…

तुमच्या मृत्यूनंतर तुमची आठवण राहावी यासाठी तुम्हाला अकाऊंट तसेच ठेवायचे आहे की, डिलीट करायचे आहे याचा पर्याय देण्यात आला आहे.

मेमोरिअलाईज्ड अकाऊंट

१. तुम्ही गेल्यानंतर तुमच्याबद्दलच्या भावना तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईक तुमच्या वॉलवर व्यक्त करु शकतात.

२. यामध्ये तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमच्या नावासमोर रिमेंबरींग असा शब्द दिसतो.

३. प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये जाऊन फेसबुक यूजर्सना हे सेटिंग करता येणार आहे.

४. मेमोरिअलाईज्ड अकाऊंट असलेल्या व्यक्तीबाबत तुम्हाला ‘पिपल यू मे नो’, वाढदिवस किंवा संबंधित इतर गोष्टी दिसणार नाहीत.

डिलिटींग अकाऊंट

फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये जनरल सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचे नाव विचारले जाते. ते टाकल्यास या व्यक्तीला तुमचे अकाऊंट डिलीट करण्याचे अधिकार मिळतात. मात्र हे आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत नसते. परंतु हे अतिशय सोपे असे सेटिंग आपण करुन ठेवल्यास आपल्या मृत्यूनंतर अकाऊंट डिलीट करणे सोपे होते. यातही आपण ज्या व्यक्तीचे नाव देत आहोत तो व्यक्ती आपल्या विश्वासातला असावा.