व्हॅलेंटाईन वीकमधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तो ‘प्राॅमिस डे’. रोझ,चाॅकलेट आणि टेडी बेअरसारखी गिफ्ट्स आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला दिल्यानंतर आता वेळ आली आहे ती तिच्या किंवा त्याच्या मनात आपल्या प्रेमाची तीव्रता बिंबवून देण्याची.  ‘प्राॅमिस डे’च्या दिवशी देण्यात येणारं प्राॅमिस हे काही हवेचे बुडबुडे नसतात. तर या प्राॅमिसेस चं महत्त्व मोठं असतं. तुमच्या रिलेशनशिपचा तो एक मोठा भाग बनणार असतो. म्हणून आज तुम्ही जे बोलणार ते फार महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शब्द जपून वापरा आणि जे म्हणाल ते कसोशीने पाळायचा प्रयत्न करा.

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये चढउतार असतात. प्रत्येक रिलेशनशिपची वेगळी अशी काही आव्हानं असतात. ती आव्हानं त्या दोघांनाच माहीत असतात. आजच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या वचनांमधून हीच आव्हानं दूर करायची संधी तुम्हाला आहे.

Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

१. रिलेशनशिपमध्ये एकमेकांना सांभाळून घेणं खूप महत्त्वाच असतं. तुझ्या प्रत्येक संकटाच्या प्रसंगीही मी तुझ्यासोबत असेन.

२. मी नेहमी तुझ्यासोबत असेन आणि तुझी कायम साथ देईन.

३. माझ्यावर तुझा विश्वास कायम राहील याची मी कायम काळजी घेईन

४.  मी तुझ्याशी नेहमीच प्रामाणिक राहीन

५. आपलं नातं हे फक्त आणि फक्त आपल्या दोघांचच असेल. त्यात मी अनावश्यक गोष्टींना किंवा लोकांनाही येऊ देणार नाही.

६. तू दुखावणार नाहीस याची मी नेहमी काळजी घेईन.

७. मी तुला कधीही एकटं वाटू देणार नाही.

८. रिलेशनशिपमध्ये एकमेकांशी होणारा संवाद महत्त्वाचा असतो. हा संवाद मी कायम राखेन.

आणि सगळ्यात महत्त्वाचं….

९. आपल्या या नात्याला मी माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान देईन