उन्हाळ्यात सूर्याच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा वाढतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे थकवा अधिक जाणवतो. उन्हाळ्यात भूक कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे कफविकार वाढू न देणारे, पचन वाढविणारे आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे रात्रीचे जेवण कसे असावे याविषयी थोडक्यात.

वाचा : उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात हे पदार्थ आवर्जून असावेत

– उन्हाळ्यात रात्रीचे जेवण हलके असावे.

– जेवणात वरण -भात, तूप, लिंबू असावे.

– ज्यांना भात आवडता नाही त्यांनी पोळी भाजी, आमटी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी खावी.

– शक्यतो जेवणात हिरव्या भाज्या असाव्यात.

– मूगाची खिचडी किंवा ताकही रात्रीच्या जेवणात असलं तरी चालेल.

– जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे गरमा-गरम सूप घ्यायला हरकत नाही.

– रात्रीच्या वेळी शक्यतो मांसाहार टाळावा. जर असेलच तर तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजीही जेवणात असावी.

– साजूक तूप जेवणात वापरावं.

– जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते.

– हा आंब्याचा मोसम आहे त्यामुळे आंब्याचा रस, सायीसकट दूध, खडीसाखर व वेलची पूड मिक्सरमध्ये एकत्र करून फ्रीजमध्ये न ठेवता प्यावे.

Health Tips : खरबूज निवडताना ही काळजी घ्या