14 December 2017

News Flash

व्हॉटसअॅपचे स्टेटस होणार ‘कलरफूल’

जाणून घ्या 'या' नव्या फिचरविषयी...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 8, 2017 11:15 AM

व्हॉटसअॅप लोगो

जगभरातील प्रसिद्ध अॅप्लिकेशन म्हणून ओळखले जाणारे व्हॉटसअॅप आता कलरफूल होणार आहे. आता हे कसे काय? तर कंपनीने आपल्या ग्राहकांना आणखी सुविधा देत त्यांना खूष करायचे ठरवले आहे. दिवसागणिक या अॅपमध्ये समाविष्ट होणाऱ्या फिचर्समध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांचा या अॅपकडे असणारा ओढा वाढत आहे. हा वापर आणखी आनंददायी व्हावा यासाठी कंपनी नवनवीन प्रयोग करताना दिसते. हा कलरफूलनेस हे त्याचेच एक उदाहरण आहे.

जगभरात अगदी कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या आणि सर्व वयोगटात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या व्हॉटसअॅपने हे नवीन फिचर्स लाँच केले आहेत. यामध्ये कलरफूल शब्दात वापरकर्त्यांना आपलं स्टेटस ठेवता येणार आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपच्या यूजर्ससाठी ही नक्कीच खूशखबर आहे. या नवीन फिचरची चाचणी सुरु असून लवकरच ते वापरासाठी उपलब्ध होईल असेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. याआधी फेसबुकने आपल्या यूजर्सना टॅबसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली होती.

व्हॉटसअॅपचे बीटा यूजर्स ही सुविधा आताही वापरु शकतात. इतरांसाठी ही सुविधा काही दिवसांत उपलब्ध होईल असे बोलले जात आहे. या फिचरसाठी स्टेटस टॅबमध्ये कॅमेरा आयकॉनच्या वरच्या बाजूला एक पेन्सिल देण्यात आली आहे. या पेन्सिलच्या माध्यमातून आपल्या आवडीचा कलर निवडता येणार आहे. त्यामुळे आता व्हॉटसअॅपचे स्टेटसही कलरफूल होणार आहे. व्हॉट्सअपकडून इथे तीन पर्याय दिले जाणार आहेत. तुम्ही इमोजी अॅड करु शकता, फॉन्ट सिलेक्ट करु शकता आणि बॅकग्राऊंड कलरही बदलू शकता. यामुळे टेक्स्ट कलरफुल होईल. मात्र तुम्ही बीटा यूजर नसाल तर तुम्हाला या फिचरसाठी वाट पहावी लागणार आहे.

First Published on August 8, 2017 11:15 am

Web Title: whats app users colorful status new feature