जगभरात सर्वाधिक वापरात असलेल्या व्हॉट्सअॅपवर आता एक नवीन समस्या उद्भवली आहे. बहुसंख्य वापरकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून जुने चॅट, मेसेज गायब होत आहेत. अनेक युजर्सनी ट्विटरसमवेत अन्य ऑनलाइन साईडवरून याविषयी तक्रार केली आहे. एका वापरकर्त्याच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून जुने मेसेज गायब होत आहेत. रोज सकाळी एक किंवा दोन चॅट उडालेले असतात. गुगल सर्च केल्यावर अन्य काही युजर्ससोबतही हाच प्रोब्लेम झाल्याचे समजले.

व्हॉट्सअॅपच्या बगविषयी आम्हाला आताच माहिती मिळाली आहे. या समस्यावर उपाय शोधण्याचे काम चालू आहे. लवकरच यावर उपाय काढू असे व्हॉट्सअॅपच्या आधिकाऱ्याने सांगितले. व्हॉट्सअॅपच्या या बगविषयी सर्वात आधी WABetaInfo या वेबसाईटला समजली.

व्हॉट्सअॅपवरून जुने मेसेज डिलीट का होतायत, याचे कारण अद्यापही उघड झालेले नाही. परंतु व्हॉट्सअॅप बॅकअप घेतल्यास मेसेज डिलीट होण्यापासून वाचतील. गुगल ड्राइव्हव्हर जाऊन तुम्ही बॅकअप घेऊ शकता.