15 August 2020

News Flash

WhatsApp चं नवीन फीचर, व्हिडिओ कॉलिंग झाली अजून मजेदार

WhatsApp ने आणलं भन्नाट फीचर...

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने युजर्सना व्हिडिओ कॉलिंगचा शानदार अनुभव देण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग फीचर अपडेट केले आहे. त्यामुळे युजर्सना आता एकाचवेळी चार जणांशी व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होता येणार आहे. ट्विटरद्वारे कंपनीने ही माहिती दिली.

WhatsApp च्या 2.20.108 व्हर्जनमध्ये हे नवीन फीचर उपलब्ध झाले आहे. नव्या अपडेटमध्ये कंपनीने ग्रुपमध्ये ‘कॉलिंग’ चा पर्याय दिला आहे. जाणून घेऊया कसं वापरायचं हे फीचर :-

या नव्या ग्रुप कॉलिंग फीचरद्वारे जर एखाद्या ग्रुपमध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असतील तर आता तुम्हाला सर्वांना वेगवेगळा कॉल करण्याची आवश्यकता नसेल. तुम्ही ग्रुपमधूनच व्हिडिओ कॉल करु शकता. नव्या अपडेटमध्ये कंपनीने ग्रुपमध्ये ‘कॉलिंग’ चा पर्याय दिला आहे. कॉलिंगच्या पर्यायावर टॅप केल्यानंतर ज्या ग्रुप मेंबर्सना व्हिडिओ कॉल करायचा असेल त्यांना सिलेक्ट करा. पण तुम्ही चारपेक्षा जास्त जणांना सिलेक्ट करु शकणार नाहीत. या चारही जणांना तुम्ही एकाचवेळी कॉल करु शकता.

याशिवाय, एक दिवसापूर्वीच कंपनीने सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांमुळे मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा कंपनीने घातली आहे. यानुसार, एखादा मेसेज तुम्ही एकदा पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण त्यानंतर मात्र जर तोच मेसेज तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करु शकणार आहात. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 10:38 am

Web Title: whatsapp changes to group video calling option brings new group video calling feature sas 89
टॅग Whatsapp
Next Stories
1 २५ दिवस दरी खोऱ्यांमध्ये फिरायला गेले होते परत आल्यावर जगभारतील करोना थैमानाबद्दल समजलं अन्…
2 लॉकडाउनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारूच्या बाटल्या, राष्ट्रपती भवनजवळ पोलिसांनी केली अटक
3 १६० कि.मी प्रती तास वेगाने चालवत होता Lamborghini, पोलिसांनी अडवलं तर म्हणाला, “करोनाच्या चाचणीसाठी चाललोय”
Just Now!
X