01 March 2021

News Flash

व्हॉट्स अॅपनं आणलेत ग्रुप अॅडमिनसाठी महत्त्वाचे अपडेट

ग्रुप मेंबरवर अंकुश ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅपचं ‘Restricted Group’हे फिचर उपयोगी पडणार आहे. लवकरच ते अँड्राइड आणि आयओएसवर उपलब्ध होणार आहे.

अँड्राइड बिटा व्हर्जनवर सध्या ‘Restricted Group’ हे फीचर उपलब्ध आहे.

व्हॉट्स अॅप हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या जगभरात लक्षणीय आहे. तेव्हा युजर्ससाठी नेहमीच महत्त्वाचे फीचर आणणाऱ्या व्हॉट्स अॅपनं ग्रुप अॅडमीनसाठी महत्त्वाचे फीचर आणले आहेत. यानुसार ग्रुपमध्ये कोणता युजर्स पोस्ट करू शकतो हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी अॅडमीनला असणार आहे. अँड्राइड 2.18.132 बिटा व्हर्जनवर सध्या ‘Restricted Group’ हे फीचर उपलब्ध आहे. लवकरच ते अँड्राइड आणि आयओएसवर उपलब्ध होणार आहे.

अनेकदा ग्रुप मेंबरपैकी काहीजण वादग्रस्त पोस्ट शेअर करतात. यावरून बऱ्याचदा ग्रुप अॅडमीनला अडचणींना समोरं जावं लागतं. कधी कधी ग्रुप मेंबरच्या याच फॉरवर्ड पोस्टमुळे ग्रुप अॅडमीनवर कारवाईही झाल्याचे समोर आलं आहे. या वादग्रस्त पोस्टमुळे ग्रुपमध्ये भांडणंही होतात. तेव्हा अशा वादग्रस्त ग्रुप मेंबरवर अंकुश ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅपचं ‘Restricted Group’हे फिचर उपयोगी पडणार आहे.

या फीचरमुळे ग्रुपमध्ये वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सदस्याला ग्रुप अॅडमीन ‘रिस्ट्रिक्ट’ करु शकतो. असं केल्यानं संबंधित सदस्य ग्रुपमधील इतर सदस्यांच्या पोस्ट वाचू शकतो, पाहू शकतो, मात्र स्वत: काही पोस्ट करु शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 6:36 pm

Web Title: whatsapp for android beta gets restricted group feature
Next Stories
1 World Asthama Day 2018 : अस्थमाचा त्रास कमी होण्यासाठी ही आसने उपयुक्त
2 १७ मे रोजी लॉन्च होणारा OnePlus 6 मिळणार ***** रुपयांना
3 असा पाहा तुमचा क्रेडिट रिपोर्ट
Just Now!
X