आज व्हॉट्सअॅप प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियात त्याला सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. भारतात व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्याही कोट्यवधींची आहे. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला प्रत्येकवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. मेसेज फॉरवर्ड, ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसह अनेक नवे फिचर व्हॉट्सअॅपने दिले आहेत. आता व्हॉट्स अॅप आणखी दोन नवे फिचर घेऊन येत आहे. ‘Forwarding Info’ आणि ‘Frequently Forwarded’ हे दोन नवे फिचर्स लवकरच येणार आहेत.

या दोन नव्या फिचरमुळे व्हॉट्सॲपवर एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला आहे हे कळणार आहे. ‘Forwarding Info’ हे फिचर मेसेज इन्फो सेक्शनमध्ये उपलब्ध होणार, याद्वारे मेसेज किती लोकांना फॉरवर्ड झाला हे कळणार, या फिचरचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित मेसेज स्वतः पाठवलेला असणे गरजेचे आहे. एखादा मेसेज चार पेक्षा जास्त युजर्सना मेसेज फॉरवर्ड केल्यास त्याला ‘Frequently Forwarded’ टॅग असणार, पण या टॅगसहित असलेल्या मेसेजना फॉरवर्ड इन्फो फीचर उपलब्ध नसणार आहे.

तर तुमचे व्हॉट्सअॅ होईल बंद –
काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरत असल्याचे व्हॉट्स अॅपच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कंपनीने मोठ पाऊल उचलले आहे. थर्ड पार्टी अॅप वापरणाऱ्यांना व्हॉट्स अॅपकडून सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. योव्हॉटसअप व्हॉटसअपसारखेच दिसणारे हे थर्ड पार्टी अॅप तुम्ही वापरत असाल तर त्वरीत बंद करा कारण यामुळे तुम्हाला व्हॉटसअॅप जास्त काळ वापरता येणार नाही. जर कोणी क्लोन अॅपद्वारे किंवा थर्ड पार्टी अॅप वापरत असेल तर त्याचे अकाउंट तुर्तास बंद केले जाईल, असे व्हॉट्सअॅपने सुचित केले आहे. जीबी व्हॉटसअप हे व्हॉटसअपशी मिळते जुळते थर्ड पार्टी अॅप आहे. याचा वापर केल्यास व्हॉटसअप तुमचे अकाउंट बंद करू शकते, असा इशारा व्हॉट्सअॅपने दिला आहे.