WhatsApp ने आपल्या युझर्ससाठी एक फिचर रोलआऊट केलं आहे. डिसअॅपिअरिंग मेसेज (Dissapearing Message) असं या नव्या फिचरचं नाव आहे. परंतु सध्या कंपनीनं याला डिलिट मेसेज असं नाव दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरबाबत चर्चा सुरू होती. आता कंपनीनं आपल्या युझर्ससाठी हे नवं फिचर लॉन्च केलं आहे. या फिचरच्या साहाय्यानं ठराविक वेळेला मेसेज आपोआप डिलिट करता येणार आहेत.

सध्या केवळ बिटा व्हर्जनसाठी हे फिचर उपलब्ध आहे. अँड्रॉईडसोबतच iOS च्या बिटा व्हर्जनवरही हे फिचर देण्यात आलं आहे. कंपनी एका क्लिनिंग टूलप्रमाणे हे फिचर डेव्हलप करत आहे. या फिचरच्या मदतीनं वेळोवेळी ग्रुप चॅट्सही आपोआप डिलिट करून स्टोरेज मॅनेज करता येऊ शकते.


ग्रुप चॅटसाठी होतंय रोलआऊट
WABetaInfo नुसार हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये आल्यानंतर युझर ठरवू शकतो की मेसेज डिलिट होण्यापूर्वी ते किती वेळासाठी चॅटबॉक्समध्ये राहिल. सध्या केवळ व्हॉट्सअॅप ग्रुप मेसेजेससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये वैयक्तीक चॅटसाठीही हे फिचर उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ग्रुप अॅडमिडला करता येईल वापर
iOS च्या २.२०.१०.२३ या व्हर्जनवर हे फिटर उपलब्ध होणार आहे. तर अँड्रॉईडच्या २.१९.२७५ या व्हर्जनमध्ये हे फिचर उपलब्ध होईल. सध्या केवळ ग्रुप अॅडमिनलाच या फिचरचा वापर करता येणार आहे. मेसेज डिलिट करण्यासाठी यामध्ये एक तास, एक दिवस, एक आठवडा आणि एक महिना असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत.