लॉकडानमुळे सर्वजण घरूनच काम करत आहेत. घरातून काम करताना Video call आणि Video Conferencing साठी Zoom App चा वापर खूप प्रमाणात वाढला आहे. हे चित्र पाहून WhaatsApp ही आपल्या व्हिडिओ कॉलिंग फिचरमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बेटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरू आहे.

या नव्या अपडेटसंदर्भात WAbetainfoने आपल्या ट्विटरवर याचं संकेत दिले आहेत. व्हिडिओ कॉलिंग फिचर अपडेट केल्यानंतर चार किंवा त्यापेक्षा जास्त जणांशी एकाचवेळी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. हे फिचर आल्यानंतर Zoom App आणि दुसऱ्या व्हिडिओ कॉलिंग अॅपला व्हॉट्स अॅप टक्कर देणार आहे.

WAbetainfo च्या वृत्तानुसार, हे फिचर iOS 2.20.50.23 वर आधीपसूनच उपलबद्ध आहे. नव्या अपडेटमध्ये कंपनीने ग्रुपमध्ये ‘कॉलिंग’ चा पर्याय दिला आहे.

याशिवाय, सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांमुळे मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा कंपनीने घातली आहे. यानुसार, एखादा मेसेज तुम्ही एकदा पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण त्यानंतर मात्र जर तोच मेसेज तुम्हाला पुन्हा फॉरवर्ड करायचा असेल तर तुम्ही केवळ एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करु शकणार आहात. पुढील अपडेटपासून मेसेज फॉरवर्डची ही नवी मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे.