भारतात व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅपपैकी एक आहे. व्हॉट्सअॅपने नेहमीच नवीनवीन फिचर्स आणले आहेत. आता व्हॉट्सअॅप आणखी एक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरव्दारे आपल्याला एकमेकांना पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे. या वर्षांअखेरपर्यंत व्हॉट्सअॅपवर ही सुविधा उपलब्ध होणार असून यूपीआय म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’ सेवा ग्राहकांना वापरता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपची यंत्रणा काही बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करत आहे. यातील तांत्रिक गोष्टी सुरळीत झाल्या की ही सेवा व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

शिओमीचा ६ जीबी रॅमचा Mi 6 प्लस आला रे…

नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहाराला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. याचाच विचार करुन युजर्सना व्हॉट्सअॅपकडून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ही पेमेंटसेवा सुरु झाल्यानंतर ग्राहक एकमेकांना अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने पैसे पाठवू शकतील. त्यामुळे भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटसअॅपवर ही सेवा कधी येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या व्यवहाराच्या सुरक्षिततेबाबत काय याबाबत अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

जाणून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारचे फेसबुक युजर आहात?