25 April 2019

News Flash

जाणून घ्या काय आहे व्हॉटसअॅपवर नव्याने येणारा डार्क मोड

रात्रीच्या वेळी मोबाईलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. याबाबतच्या चाचण्या सुरु असून लवकरच तो प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल

प्रातिनिधिक छायाचित्र

व्हॉटसअॅप आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. ग्राहकांचा अॅपचा वापर सोपा व्हावा यासाठी कंपनीकडून हा प्रयत्न असतो. नुकतेच अपडेट झालेल्या अॅप्लिकेशनमध्ये ग्राहकांसाठी आणखी एक नवीन मोड आणण्यात आला आहे. या मोडचे नाव डार्क मोड असे असून त्यामुळे ग्राहकांच्या डोळ्याला मोबाईल स्क्रीनमुळे होणारा त्रास निश्चितच कमी होणार आहे. सध्या हा मोड इतर सोशल मीडिया, मोबाईल आणि वेबसाईटस यांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र आता तो व्हॉटसअॅपवर येणार असल्याने युजर्ससाठी ते अतिशय फायद्याचे ठरणार आहे.

रात्रीच्या वेळी मोबाईलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. याबाबतच्या चाचण्या सुरु असून लवकरच तो प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला हा मोड अॅपलच्या मोबाईलवर देण्यात येईल आणि त्यानंतर तो अँड्रॉईडसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवायही कंपनीने अनेक नवीन फिचर्स आणली आहेत. नवीन फिचर्सद्वारे डायरेक्ट व्हिडिओ कॉलची सुरुवात होणार आहे, त्यामुळे डायरेक्ट ग्रुप व्हिडिओ कॉल करता येईल. याशिवायही व्हॉटसअॅपने काही नवीन इमोजी नुकतेच आणले आहेत. काही दिवसांपूरर्वीच कंपनीने चुकून केलेला मेसेज डिलीट करण्याचा पर्याय आणला होता.

 

First Published on December 6, 2018 8:10 pm

Web Title: whatsapp new features including dark mode