19 January 2019

News Flash

व्हॉट्स अॅपवर डिलीट केलेले फोटो, व्हिडीओ असे मिळवा परत

युजर्सना त्यांच्याकडून चुकून डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स परत मिळवता येणार आहे.अर्थात अँड्राइड युजर्ससाठी हे फीचर्स असणार आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

व्हॉट्स अॅप हा आपल्यासाठी जणू अविभाज्य भागच झाला आहे. सुरुवातीला मोफत मेसेज पुरवणाऱ्या या अॅपनं गेल्या काही वर्षांत आपल्यात शेकडो बदल केलेत. व्हॉट्स अॅपनं पुरवलेल्या फीचर्समुळे आपली कितीतरी कामं सोपी झाली आहेत. आता युजर्ससाठी आणखी एक महत्त्वाचा बदल व्हॉट्स अॅपनं केला आहे त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून चुकून डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स परत मिळवता येणार आहे.

वाचा : व्हॉट्सअॅपला फेसबुकसोबत डेटा शेअर करण्यापासून कसं थांबवायचं ?

व्हॉट्स अॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ आपण डाऊनलोड केले की ते गॅलरी किंवा मोबाईलच्या फोल्डरमध्ये जमा होतात. हे फोटो आपण एकदा का आपल्या मोबाईलमधून डिलीट केले की ते पुन्हा डाऊनलोड करता येत नाही. पण आता व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये बदल केले असून हे फोटो डाऊनलोड करून जरी युजर्सनं डिलीट केले असतील तरी त्याला चॅटवर जाऊन ते परत डाऊनलोड करता येणार आहे.

इतकंच नाही तर ‘sdcard/WhatsApp/’ या फोल्डरमध्येही हे फोटो आहेत की नाही हे देखील नवीन अपडेट्सनुसार युजर्सना तपासता येणार आहे. व्हॉट्स अॅप संदर्भात माहिती देणाऱ्या WABetaInfo नं ही माहिती दिली आहे. अर्थात अँड्राइड युजर्ससाठी हे फीचर्स असणार आहे. पण समजा युजर्सनं इनबॉक्समधल्या मूळ चॅट्स डिलीट केल्या तर मात्र त्याला हे फोटो परत मिळवता येणार नाही.

 वाचा : फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटरला कंटाळलात? तर आता म्हणा ‘Hello’

First Published on April 16, 2018 1:09 pm

Web Title: whatsapp now allows android user to redownload accidentally deleted photos and videos and files