News Flash

WhatsApp Pay ला मिळाली मंजुरी, ठरणार सर्वात मोठी Mobile Payment सेवा?

WhatsApp वर युजर्सना पैशांची देवाण-घेवाण करता येणार

फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर लवकरच युजर्सना पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. कंपनीला आता यासाठी राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून परवाना मिळालाय. त्यामुळे लवकरच कंपनीकडून WhatsApp Pay सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

WhatsApp ने 2018 मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जवळपास 10 लाख युजर्ससाठी जारी केले होते. परंतु, याला कायदेशीर मंजुरी मिळाली नव्हती. पण आता भारतात WhatsApp Pay ला NPCI कडून मंजुरी मिळालीये. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ही सेवा १० लाख युजर्सपर्यंत पोहोचू शकते असं वृत्त Business Standard ने दिलं आहे. युजर्सकडे अ‍ॅपच्या आत एक पेमेंट चा पर्याय असणार आहे. त्यावरूनच युजर्स यूपीआयवरून घेवाण-देवाण करू शकणार आहेत. कंपनीकडून ही सेवा सर्व ग्राहकांना दिली जाण्याची शक्यता आहे.

भारतात सध्या 40 कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहेत. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्याने ही सेवा सुरू झाल्यानंतर ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल पेमेंट सेवा ठरू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 9:15 am

Web Title: whatsapp pay service may rollout in india soon as it gets permission from npci sas 89
Next Stories
1 Xiaomi चा बजेट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल 5000 mAh ची दमदार बॅटरी
2 टाचदुखीने त्रास्त आहात ? ही काळजी घ्या म्हणजे मिळेल आराम
3 चॉकलेटचा इतिहास माहित आहे का?
Just Now!
X