News Flash

भारतात लवकरच व्हॉट्सअॅपची पेमेंट सर्व्हिस सुरू होणार

व्हॉट्सअॅपने डेटा लोकलायझेशनशी निगडीत कामही पूर्ण केले आहे.

व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट व्यवसायासाठी भारतात डेटा स्टोरेज व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सर्व्हिसचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ग्लोबल पेमेंट कंपन्यांना आपला भारतीय ग्राहकांचा डेटा देशातच ठेवण्याची अट घातली होती. त्यानुसार व्हॉट्सअॅपनेही भारतातच डेटा स्टोरेज व्यवस्था तयार केली आहे.

दरम्यान, व्हॉट्सअॅप यूपीआयवर आधारीत ही सेवा सर्वप्रथम आयसीआयसीआय बँकेसोबतच सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर अॅक्सिस बँक, एचडीएफसी आणि एसबीआयसारख्या बँकांना सोबत घेण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपने डेटा लोकलायझेशनशी निगडीत कामही पूर्ण केले असून रेग्युलेटरकडे याचा अहवाल सोपवल्यानंतर कंपनी पेमेंट अॅप्लिकेशन सर्वांसाठी लॉन्च करणार आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार पेमेंट कंपन्यांनानी डेटा स्टोअर करण्याची व्यवस्था तयार केल्यानंतर त्याचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इंडियन कंप्यूटर इमरजंसी रिस्पॉन्स टीममध्ये (CERT-N) असलेले लेखापरीक्षक त्याचे लेखापरीक्षणाचे काम करतात. दरम्यान, याबाबत अद्याप आयसीआयसीआय बँक किंवा व्हॉट्सअॅपकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच नॅशनल पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाकडूनही (NPCI) याबाबत माहिती देण्यात आली नाही.

व्हॉट्सअॅपने या पेमेंट सर्व्हिसचा पायलट प्रोजेक्ट वर्षभरापूर्वीच लॉन्च केला होता. तसेच गेल्या वर्षीच कंपनीने आयसीआयसीआय बँकेच्या मदतीने पेमेंट फिचर लॉन्च करण्याचे प्रयत्न केले होते. परंतु बिटा सर्व्हिसपर्यंत त्यांना ते मर्यादित ठेवावे लागले होते. यावर्षी अॅमेझॉननेही एक्सिस बँकेसोबत मिळून यूपीआय बेस्ड पेमेंट सर्व्हिस लॉन्च केली होती. तसेच गुगल पे, अॅमेझॉन, ओला, उबेर अशाप्रकारचे थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स यूपीआयचा पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून वापर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:57 pm

Web Title: whatsapp payment services soon to launch in india jud 87
Next Stories
1 #SunglassesDay: चेहरेपट्टीनुसार सनग्लासेस निवड कशी करावी आणि इतर टीप्स
2 ‘या’ मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद
3 पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश
Just Now!
X