भारतातील आपल्या सर्व युजर्ससाठी पेमेंट सेवा सुरू करण्याची तयारी व्हॉ्टस अॅपने केली आहे. यासाठी परवानगीची मागणी करणारं पत्र व्हॉट्स अॅपने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवलं आहे. देशभरात व्हॉट्स अॅपचे जवळपास 20 कोटी ग्राहक आहेत.

यावर्षीच्या सुरूवातीला कंपनीने जवळपास 10 लाख ग्राहकांसोबत पेमेंट सेवा देण्याची सुरूवात प्रायोगिक तत्त्वावर केली होती. अनेक महिने वाट पाहिल्यानंतरही व्हॉट्स अॅपला यासाठी परवानगी मिळाली नव्हती. आता पुन्हा एकदा कंपनीने आरबीआयच्या गव्हर्नरकडे परवानगीची मागणी केली आहे. पाच नोव्हेंबर रोजी याबाबतचं पत्र आरबीआयला पाठवण्यात आलं आहे.

युपीआयवर (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजीटल पेमेंट सेवा सुरु करण्याची तयारी व्हॉट्सअॅपने सुरू केली असल्याचं समजतंय. पेटीएम, भीम अॅप, फ्रीचार्ज, मोबीक्विक यासारखी वॉलेट्स किंवा डिजीटल पेमेंट करणारी अॅप्स भारतात लोकप्रिय आहेत. मात्र, जर व्हॉट्स अॅपला परवानगी मिळाली तर या सर्व अॅप्सना तगडी टक्कर मिळण्याची चिन्हं आहेत.