News Flash

तुमच्यासोबत आता व्हॉट्स अॅपही सुट्टीवर जाणार, ‘व्हेकेशन मोड’ लवकरच येणार

सुट्टीवर जाणाऱ्यांसाठी व्हॉट्स अॅप आणणार नवीन फिचर

'व्हेकेशन मोड' लवकरच येणार

फेसबुकच्या मालकीचे असणारे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाणारे व्हॉटस अॅप लवकरच एक नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या नवीन फिचरमुळे सुट्टीवर असताना व्हॉट्स अप वापरणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कंपनी आपल्या बीटा व्हर्जनवर ‘व्हेकेशन मोड’ या नवीन फिचरची चाचणी करत असल्याची माहिती व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जनसंदर्भात बातम्या देण्याऱ्या ‘डब्यूएबीटाइन्फो’ या वेबसाईटने सांगितले आहे.

वर्षभरामध्ये अनेक नवीन नवीन फिचर्स लॉन्च करणाऱ्या व्हॉट्स अपने मागील काही महिन्यांपासून या ‘व्हेकेशन मोड’ फिचरवर काम करत आहे. सध्या अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ‘व्हेकेशन मोड’ असल्याचे वेबसाईटचे म्हणणे आहे. सध्या सायलेन्ट मोडवर व्हॉट्स अॅप वापरताना किती मेसेज आले यासंर्भातील नोटीफिकेशन्सचे आकडे व्हॉट्स अॅपच्या आयकॉनवर दिसत नाहीत.

मात्र नवीन ‘व्हेकेशन मोड’मध्ये व्हॉट्स अॅप म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह केले जातील मात्र त्यावेळी आधीच अर्काइव्हमध्ये सेव्ह असणारे मेसेजही तेथेच राहतील. सध्या नवीन मेसेजेस आल्यानंतर जुने मेसेजस आपोआपच अनअर्काइव्ह केले जातात. म्हणजे आता व्हॉट्स अॅप ‘व्हेकेशन मोड’वर असताना नवीन मेसेज आल्यानंतर संग्रहित मेसेजस आपोआप काढले जाणार नाहीत. हा पर्याय ऐच्छिक असेल. नोटिफिकेशन सेटिंग्समधून युझर्सला हे फिचर सुरु ठेवायचे की नाही हे ठरवता येईल.

या शिवाय कंपनी लिंक्ड अकाऊण्ट फिचरवही काम करत आहे. या फिचरमुळे युझर्सला त्यांचे व्हॉट्स अॅप अकाऊण्ट इतर अकाऊण्टशी कनेक्ट करता येणार आहे. प्रोफाइल कनेक्ट करण्याच पर्याय प्रोफाइल सेटिंगमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. प्रयोगिक तत्वावर हे फिचर केवळ इन्स्टाग्रामसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे समजते. या फिचरमुळे युझर्सला काय फायदा होणार आहे याबद्दल आद्याप स्पष्टपणे काही सांगता येणे शक्य होणार नसले तरी ‘डब्यूएबीटाइन्फो’च्या ट्विटनुसार या फिचरच्या माध्यमातून युझर्सला त्यांच्या फेसबुक अकाऊण्टवरील डेटा रिकव्हर करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 9:59 am

Web Title: whatsapp testing new mode that will let you enjoy holidays in peace
Next Stories
1 व्होडाफोन ९९ आणि १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देणार या सुविधा
2 मार्क झकरबर्गला अध्यक्षपदावरुन हटवा; कंपनीच्या गुंतवणूकदारांची मागणी
3 जय महाराष्ट्र: जाणून घ्या सांबारचं संभाजी महाराज कनेक्शन
Just Now!
X