लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp कडून आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स आणले जातात. आता कंपनी अजून एक नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून WhatsApp वर रीड लेटर (Read Later) आणि मल्टी डिव्हाइस सपोर्ट (Multi-Device Support) फिचर येणार असल्याची चर्चा होती. पण आता एका नवीन रिपोर्टनुसार कंपनी स्टिकर शॉर्टकट (Sticker Shortcut) नावाच्या एका फिचरवर काम करत असल्याचं वृत्त आहे.

आणखी वाचा- Twitter वर पुन्हा सुरू झालं ‘ब्लू टिक व्हेरिफिकेशन’, तीन वर्षांनी झालं पुनरागमन; जाणून घ्या डिटेल्स

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फिचर चॅट बारमध्ये पाहायला मिळेल. नव्या फिचरचं काम तुमच्यासाठी योग्य स्टिकर शोधणं सोपं करणं असेल. हे फिचर तुमच्या चॅट बारमध्ये दिसेल. जेव्हा तुम्ही एखादा इमोजी किंवा शब्द टाइप कराल तेव्हा चॅट बारमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आयकॉन दिसेल. याचा अर्थ त्या शब्दाशी किंवा इमोजीशी निगडीत स्टिकरही उपलब्ध आहे. हे स्टिकर बघण्यासाठी तुम्हाला की-बोर्डच्या आयकॉनवर टॅप करावं लागेल (की-बोर्डला एक्सपान्ड केल्यानतंर ), नंतर स्टिकर्स समोर येतील. इथूनच तुम्ही स्टिकर्स वापरता येतील, म्हणजे स्टिकर फिचरमध्ये जाऊन शब्द टाइप करुन शोधण्याची मेहनत वाचेल. सध्या या फिचरवर टेस्टिंग सुरू आहे, काही दिवसांनी हे फिचर बीटा युजर्ससाठी उपलब्ध होईल.

आणखी वाचा- Google चा मोठा निर्णय, ‘या’ अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर नाही काम करणार व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप

नवीन अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक
स्टिकर शॉर्टकट फिचरशिवाय कंपनी आपल्या अँड्रॉइड आणि iOS अ‍ॅप्ससाठी एक नवीन अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक जारी केलंय. नवीन पॅकचं नाव Sumikkogurashi असून 2.4MB इतकी साइज आहे. याचा वापर व्हॉट्सअ‍ॅप वेब युजर्सही करु शकतात. युजर्सना हे पॅक डाउनलोड करण्यासाठी sticker store मधून डाउनलोड करावं लागेल.