News Flash

व्हॉट्सअॅप अपडेट! चार नवीन फीचर्सची भर

आयफोनच्या नव्याने लाँच झालेल्या फोनमध्ये हे नवीन अपडेटस देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यात iPhone Xr, iPhone Xs, iPhone Xs max या फोनचा समावेश

संग्रहित छायाचित्र

फेसबुकच्या मालकीचे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखले जाणारे व्हॉटसअॅप लवकरच अपडेट होणार आहे. या अॅप्लिकेशनमध्ये चार नवीन फीचर्सची भर पडणार असल्याचे नुकतेच कंपनीकडून सांगण्यात आले आहे. युजर्सचा वापर सोयीचा व्हावा यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन सुविधा देण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने आता काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आयफोनच्या नव्याने लाँच झालेल्या फोनमध्ये हे नवीन अपडेटस देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यात iPhone Xr, iPhone Xs, iPhone Xs max या फोनचा समावेश आहे.

१. बबल अॅक्शन मेनूचे डिझाईन बदलण्यात आले आहे. जास्त वेळ टॅप केल्यावर तुम्हाला हा मेनू दिसू शकेल. तसेच यामध्ये डिलिट, रिप्लाय, फॉरवर्ड, स्टार, कॉपी आणि इतरही अनेक पर्याय उपलब्ध होतील. मेसेजिंक जास्तीत जास्त सोपे व्हावे यासाठी कंपनीने हा बदल केला आहे.

२. सध्या ऑडीयो मेसेज आल्यावर प्रत्येक मेसेजवर जाऊन तो ऐकावा लागतो. मात्र अपडेट करण्यात आलेल्या फिचरमध्ये सगळे ऑडीयो एकामागे एक असे ऐकू येणार आहेत. त्यामुळे मागे जाऊन एक एक ऑडीयो मसेजवर क्लिक करण्याची आवश्यकता राहणार नाही.

३. इतरांनी अपडेट केलेल्या व्हॉटसअॅप स्टेटसमध्ये आधी केवळ टेक्स आणि स्मायली यांच्याद्वारे रिप्लाय देता येत होता. यामध्ये GIF, फोटो, व्हिडियो अॅटॅच करण्याची सुविधा होती. यामध्ये आता व्हॉईस मेसेज, लोकेशन, डॉक्युमेंटस आणि व्हीकार्ड म्हणजेच कॉन्टॅक्ट शेअर करता येणार आहे. आयफोनधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

४. व्हॉटसअॅपच्या नोटीफीकेशनमध्ये सध्या मेसेजशिवाय इमेज, GIF दिसतात. मात्र येत्या काळात त्यामध्ये व्हिडियोही दिसू शकणार आहेत. व्हॉटसअॅपच्या 2.18.100 या व्हर्जनवर भविष्यात हा बदल होणार असून त्यामुळे आपल्याला कोणता व्हिडियो आला आहे हे नोटीफीकेशनद्वारे समजणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने व्हेकेशन मोड सुरु केला होता. त्यामुळे तुम्ही गावाला गेलात किंवा सुटीवर असाल तर तेवढ्या काळापुरता व्हॉटसअॅप बंद ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या अॅपवरील ‘सायलेन्ट मोड’च्याच पुढची पायरी म्हणजे ‘व्हेकेशन मोड’ असल्याचे वेबसाईटचे म्हणणे आहे. सध्या सायलेन्ट मोडवर व्हॉट्स अॅप वापरताना किती मेसेज आले यासंर्भातील नोटीफिकेशन्सचे आकडे व्हॉट्स अॅपच्या आयकॉनवर दिसत नाहीत. नवीन ‘व्हेकेशन मोड’मध्ये व्हॉट्स अॅप म्यूटवर टाकल्यास येणारे नवीन मेसेजेस अर्काइव्हसमध्ये सेव्ह केले जातील मात्र त्यावेळी आधीच अर्काइव्हमध्ये सेव्ह असणारे मेसेजही तेथेच राहतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:33 pm

Web Title: whatsapp update four new features for ios
Next Stories
1 दिवाळीत असा जपा तुमचा फॅशन सेन्स
2 फ्लिपकार्टच्या ‘फेस्टीव धमाका सेल’ मध्ये मिळणार ८ ते १५ हजारांची डिस्काऊंटस
3 5 दिवसांच्या सेलमुळे मालामाल झाले फ्लिपकार्ट, अॅमेझॉन ; कमावले ‘इतके’ कोटी रुपये
Just Now!
X