सोशल मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या व्हॉट्सॲपवर दररोज विविध प्रकारचे मेसेज व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स अॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये व्हॉट्स अॅपच्या दशकपूर्तीनिमित्त युजर्सला एक हजार जीबीचा डेटा मोफत दिला जाणार आहे. पण, या मेसेजसोबत आलेल्या लींकवर क्लीक केल्यास बँक खात्यातून काही रक्कम गायब होण्याची शक्यता आहे.

व्हायरल होणाऱ्या या मेसेजबाबत कंपनीने स्पष्टिकरण दिले आहे. या सर्व अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमच्याकडून असा कोणताही मोफत डेटा देण्यात येत नाही. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या अशा खोट्या मेसेज आणि लिंकपासून साधव राहा, आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.

a china child girl made Mouse Shaped Momos video goes viral
चिमुकली हौशीने खातेय उंदीर ? बनवले उंदराच्या आकाराचे मोमोज, VIDEO पाहून तुम्हीही डोकं धराल
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Habit of chewing gum is good or not for health know drawbacks and benefits
च्युइंगम खाताय? च्युइंगम खाण्याचे तोटे वाचून बसेल धक्का; ही सवय तात्काळ सोडा, अन्यथा..

व्हॉरल होणाऱ्या मेसेजमधील लिंकवर क्लीक केल्यास तुमच्या फोनमधील खासगी माहिती लिक होण्याची शक्यता आहे. तसेच युझर्सचे बँक डिटेल्स मिळवून फसवणूक होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे व्हायरल होणारा मेसेज –
व्हाट्सअॅपला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल युझर्सला एक हजार जीबी डेटा मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी खालील लिंकवर क्लीककरून क्लेम करा.