व्हॉट्सअपवर लवकरच तीन खास फिचर्स युझर्ससाठी उपलब्ध होणार आहेत. हे फिचर्स खऱ्या अर्थाने खास असतील. टॅप टू अनलॉक आणि ग्रुप मेसेजला प्रायव्हेट रिप्लाय देण्याची सोय आणि एकाच वेळी व्हिडीओ कॉल आणि चॅट करता येणार आहे. हे अपडेट्स असणाऱ्या बिटा व्हर्जनची चाचणी सध्या सुरु असल्याचे समजते.

टॅप टू अनलॉक
‘वेबबीटाइन्फोन’ वेबसाईटने या नवीन अपेड्टस संदर्भात दिलेल्या माहितीनुसार आपण ब्लॉक केलेल्या कॉन्टॅक्टशी चॅट करण्यासाठी कॉनटॅक्ट लिस्टमध्ये जाऊन संबंधीत क्रमांकावर फक्त टॅप केल्यावर चॅट विंडो ओपन होण्याचे नवीन फिचर व्हॉट्सअप देणार आहे. तसेच एखाद्या क्रमांकावर टॅप करुन होल्ड करुन ठेवल्यास त्याला कॉल अथवा मेसेज करता येणार आहे.

प्रायव्हेट रिप्लाय
तर या अपडेटमधील युझर्सच्या दृष्टीने महत्वाचे प्रायव्हेट रिप्लाय करण्याचे फिचरही या चाचणीनंतर व्हॉट्सअपवर लवकरच अॅक्टीव्ह होईल. ग्रुप मेसेजेसवर प्रायव्हेट रिप्लाय देण्याच्या या सोयीमुळे ग्रुपवर ‘पीसीवर ये’, ‘पर्सनलवर बोलू’ असे म्हणत ग्रुप चॅट सोडण्याची गरज पडणार नाही. आयओएसमध्ये उपलब्ध असणार कॉल इनव्हाइटचा पर्याय आता अॅण्ड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध होणार आहे. मात्र हा पर्याय फक्त ग्रुप अॅडमिनलाच उपलब्ध असेल असे वेबबीटाइन्फोनचे म्हणणे आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर काही चुकीचे पोस्ट झाले असेल तर तुम्ही त्याबद्दल व्हॉट्सअपला रिपोर्ट करु शकता. या पर्यायामध्ये कॉनटॅक्ट पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची तक्रार व्हॉट्सअपपर्यंत पोहचवली जाईल ज्यावर व्हॉट्सअप योग्य ती कारवाई करेल. याशिवाय ग्रुप इन्फोचा पर्यायही अॅडमीनसाठी उपलब्ध होईल. अॅडमीन सेटिंग असा नवीन टॅब केवळ अॅडमीन्सला हाताळता येईल.

पिक्चर इन पिक्चर
हे एकदम भन्नाट फिचरही लवकरच व्हॉट्सअपवर दिसेल. यात एखाद्या युझरबरोबर व्हिडीओ कॉल करतानाच दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅट मेसेजवर गप्पा मारता येतील.

ग्रुप कॉल्स
आयओएस युझर्सला लवकरच व्हॉट्सअप ग्रुप कॉल करता येणार आहे. यासंदर्भात काम सुरु असून लवकरच आयओएस सिस्टीमसाठी त्याची चाचणी केली जाईल.

याशिवाय व्हॉट्सअप व्यवसायिकांसाठी खास अॅपही लॉन्च करणार असल्याचे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर नमूद कऱण्यात आले आहे.