News Flash

जाणून घ्या तुमच्या मोबाईल अॅपची युनिक फिचर

ज्यांच्या मदतीने आपण आणखीन मजेदाररीत्या या अॅप्लिकेशन्सचा आनंद घेऊ शकतो.

अन्न, वस्त्र, आणि निवारा यांबरोबरच आता ‘इंटरनेट’ ही देखील आधुनिक मानवाची मुलभूत गरज आहे. जगात कुठेही सहजरीत्या संपर्क साधण्यास मदत करणारी ‘व्हॉट्स अॅप’ सारखी अॅप हे मागचे मुख्य कारण होय. या अॅपचा वापर आणखीन मजेदार व्हावा यासाठी सातत्याने त्यांना अपडेट केले जाते. वॉट्सअॅपमध्ये देखिल असेच काही फिचर वाढवण्यात आले आहेत ज्यांच्या मदतीने आपण आणखीन मजेदाररीत्या या अॅप्लिकेशन्सचा आनंद घेऊ शकतो. चला तर मग अशा ५ युनिक फिचर विषयी जाणून घेऊ…

  • व्हॉट्स अॅपवर आपल्याला सातत्याने शेकडो संदेश येत असतात. त्यामुळे आलेला संदेश आपण वाचलेला आहे की नाही हे पाठवणाऱ्याला कळावे यासाठी त्यात निळ्या रंगाच्या टीकमार्कची सोय करण्यात आली. परंतु बऱ्याच जणांना आपण तो संदेश वाचला आहे ते दाखवायचे नसते. अशा मंडळींनी मोबाईलमध्ये फ्लाईटमोड सुरु करावा. आणि आलेले सर्व संदेश वाचावे. जर आपला मोबाईल फ्लाईट मोडमध्ये असेल तर आपण वाचलेल्या संदेशांना वॉट्सअॅपवर निळ्या रंगाचा टीकमार्क येत नाही.
  • एखादा अनोळखी पत्ता आपल्याला सहज गतीने शोधता यावा यासाठी गुगलने ‘गुगल नॅव्हिगेशन’ हे जीपीएस तंत्रज्ञान विकसीत केले.  पुढे या तंत्रज्ञानाचा वापर इतका वाढत गेला की समाजमाध्यमांवरील जवळ जवळ प्रत्येक अॅप्लिकेशनमध्ये त्याचा वापर केला जाऊ लागला. एखाद्या आपात्कालीन परिस्थितीत आपला ठावठिकाणा आपल्या नातेवाईकांना कळावा यासाठी व्हॉट्स अॅपमध्ये हे तंत्रज्ञान वापरले गेले. परंतु आपले लाईव्ह लोकेशन जर कोणाला कळू द्यायचे नसेल तर त्यावर एक उपाय आहेत. आपण १५ मिनिटे, १ तास, आणि ८ तास असे एकुण तीन वेळा आपले लोकेशन कोणालाही पाठवू शकतो. अॅटॅचमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यातील लोकेशनमध्ये जावे. त्यानंतर त्यात शेअर ‘लाईव्ह लोकेशन’ आणि ‘सेंड यूवर करंट लोकेशन’ हे दोन पर्याय दिसतील. त्यातील एक ऑप्शन सिलेक्ट करावा. आणि त्यात आपली वेळ निश्चित करावी.
  • बऱ्याचदा आपल्याकडून चुकीचा संदेश चुकीच्या ठिकाणी पाठवला जातो. यावर आपण आपण अनेकदा दिलगीरी व्यक्त केली आहे. परंतु ही ट्रीक वापरली तर आपल्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ कधीही येणार नाही. आपण तो संदेश सिलेक्ट करुन डिलिट बटण दाबावे. त्यानंतर आपल्याला ‘डिलिट फॉर मी’ आणि ‘डिलिट फॉर एव्हरीवन’ हे दोन पर्याय दिसतील. त्यातील ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ हा पर्याय सिलेक्ट करुन आपण चुकून सेंड झालेला मेसेज डिलीट करु शकतो.
  • वॉट्सअॅप चॅटींग आणखीन मजेदार करण्यासाठी आपण विविध प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओचा वापर करतो. परंतु हे गिफ्स आपण आहेत त्याच प्रकारात पाठवू शकतो. आणि त्यात काही जर बदल करायचे असतील तर आपल्याला दुसऱ्या एखाद्या एडिटींग अॅप्लिकेशनचा वापर करावा लागतो. परंतु आता व्हॉट्स अॅप अॅप्लिकेशनमध्येच एडिटींगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तिचा वापर करण्यासाठी अटॅचवर क्लिक करावे. त्यात आपल्याला मोबाईल फोटो गॅलरी हा पर्याय मिळेल. त्यातील हवा तो फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट करावा. व्हिडिओ हा ६ सेकंदांपेक्षा मोठा असू नये अन्यथा त्याला जिफ फॉर्ममध्ये फॉरवर्ड करता येत नाही. जिफ सिलेक्ट केल्यावर त्यात आपल्याला एडिट हा ऑप्शन मिळतो त्याचा वापर करुन आपण हवे ते बदल आपल्याला करता येतात.
  • व्हॉट्स अॅप हे अॅप्लिकेशन आजवर आपण फक्त इंग्रजी भाषेतच वापरत होतो. पण जर आपल्या मातृभाषेत त्याचा वापर करायचा असेल तर ती सुविधा देखील आता उपलब्ध आहे. व्हॉट्स अॅपमधील सेटींगमध्ये जावे. त्यातील चॅट हा ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यात आपल्याला मराठी, हिंदी, तेलुगु, गुजराती असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील हवा तो पर्याय निवडावा आणि चॅटींगचा आनंद घ्यावा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 7:43 pm

Web Title: whatsapp will bring this amazing new feature
Next Stories
1 मुकेश अंबानींची ‘जीवनरक्षक कार’, किंमत ८.५ कोटी
2 Video : धोनीसाठी कायपण! मराठी चाहत्यानं तयार केलेलं गाणं ऐकलंत का?
3 ७०० वर्षे जुने झाड सलाइनवर
Just Now!
X