लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp वर युजर्सना चॅटिंगची मजा घेता यावी यासाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपवर 138 नवीन Emoji येणार आहेत. कंपनीने नवीन इमोजी अँड्रॉइडच्या व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जन 2.20.197.6 बीटामध्ये टेस्टिंगसाठी जारी केले आहेत. टेस्टिंगनंतर सर्व युजर्ससाठी नवीन इमोजी रोलआउट केले जातील. WhatsApp चे फीचर्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.

कसे आहेत नवीन इमोजी –
नवीन इमोजीमध्ये काही नवीन व्यवसाय- शेफ, शेतकरी, पेंटर यांचा समावेश आहे. यासोबतच व्हीलचेअर असलेले काही इमोजी आणले आहेत. रिपोर्टनुसार नवीन इमोजी जुन्या इमोजींपेक्षा थोडे वेगळे असतील. यामध्ये नवीन स्किन टोन्स, नवीन कपडे, नवीन हेअरस्टाइल आणि नवीन रंगांचा वापर करण्यात आला आहे.

(फोटो – WABetaInfo)
(फोटो – WABetaInfo)

मेसेजसोबत स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी Emoji हा अनेक युजर्ससाठी सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्हालाही नवीन इमोजीचा इतरांच्या आधी वापर करायचा असेल तर यासाठी तुम्हाला गुगल प्लेचा बीटा प्रोग्रॅम जॉइन करावा लागेल. दरम्यान, एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अनेक डिव्हाइसवर वापरता यावं या फीचरवरही WhatsApp कडून दीर्घ काळापासून काम सुरू आहे. हे फीचरही लवकरच सर्व युजर्ससाठी रोलआउट केलं जाणार आहे. मल्टिपल डिव्हाइस सपोर्टसाठी ‘ ‘Linked Devices’ नावाचं एक वेगळं सेक्शन व्हाट्सअ‍ॅपच्या मेन्यूमध्ये देण्यात येईल असं समजतंय. या फीचरमुळे एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा वापर किमान चार डिव्हाइसवर करता येणार आहे.